वाशिम, 23 फेब्रुवारी: पूजा चव्हाण मृत्यू (Pooja Chavhan) प्रकरणाला आज सोळा दिवस झाले आहेत. मात्र तरीही तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. या प्रकरणात गेल्या पंधरा दिवसांपासून गायब असलेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) नुकतेच वृत्तमाध्यमांपुढे आले होते. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून पोहरादेवी गडावर मीडियाशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. पण पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांचे साधारणतः 8 ते 10 हजार समर्थक जमले होते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणू फोफावत असताना अशाप्रकराचं शक्तीप्रदर्शन करणं, सार्वजानिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता रात्री आठ वाजता वाशिम पोलिसांना जाग आल्याचं दिसत आहे.
हे ही वाचा -पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर संजय राठोड यांच्याशी संबंधित आणखी एक VIDEO झाला लीक
कारण उद्धव ठाकरे यांच्या नाराजीनंतर आता वाशिम पोलिसांनी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पण उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांना गर्दी दिसली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा गुन्हा आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी सकाळी शक्ती प्रदर्शन केलं असताना वाशिम पोलिसांना गुन्हा दाखल करायला एवढा वेळ का लागला असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.