दोन वर्षानंतर पुन्हा 'मफलर' भुजबळांच्या गळ्यात!

दोन वर्षानंतर पुन्हा 'मफलर' भुजबळांच्या गळ्यात!

दोन वर्षानंतर त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा 'मफलर' दिसू लागली आणि पूर्वीचे भुजबळ आता पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येतील असं कार्यकर्त्यांना वाटू लागलं.

  • Share this:

मुंबई,ता.10 मे: दोन वर्ष तुरूंगात काढल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गुरूवारी घरी परतले. त्यानंतर सर्वात मोठा बदल जाणवला तो त्यांच्या स्टाईलमध्ये. दोन वर्षानंतर त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा 'मफलर' दिसू लागली आणि पूर्वीचे भुजबळ आता पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येतील असं कार्यकर्त्यांना वाटू लागलं.

दिल्लीतलं नवीन महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणातला भ्रष्टाचार, ईडीचे छापे, डोळे विस्फारणारी संपत्ती, त्या संपत्तीवरचे छापे यामुळं गेली दोन वर्ष भुजबळ कायम चर्चेत राहिले. या तुरूंगवासाच्या काळात त्यांच रूपच बदलून गेलं. सुनावणीच्या वेळी किंवा विधिमंडळात कधीतरी मतदानासाठी आलेले भुजबळ अस्वस्थ, थकलेले दिसत होते. भ्रष्टाचारांच्या आरोपांनी ते खचून गेलेले दिसले.

'मफलर' ही भुजबळांची स्टाईल होती. यावर पत्रकारांनी छेडलं असताना त्यांनीच एकदा त्याचं उत्तर दिलं. भुजबळ खांद्यावरच्या ऑपरेशनसाठी परदेशी गेले असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांना उबदार मफलर घ्यायची सवय पडली. मुंबईत आल्यावरही सारखं एसीत राहावं लागत असल्यानं त्यांनी 'मफलर' गळ्यात कायम ठेवली आणि तीच त्यांची स्टाईल झाली.

 

First published: May 10, 2018, 3:28 PM IST

ताज्या बातम्या