Home /News /maharashtra /

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; खोल दरीत भयावह अवस्थेत आढळला मृतदेह

शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; खोल दरीत भयावह अवस्थेत आढळला मृतदेह

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Suicide in Nandurbar: नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील हातधुई येथे एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या (2th class student commits suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    नंदुरबार, 29 डिसेंबर: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या धडगाव तालुक्यातील हातधुई येथे एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या (12th class student commits suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर, शाळेपासून 50 मीटर अंतरावर असणाऱ्या एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला आहे. विद्यार्थ्यानं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. आकाश बावा तडवी असं आत्महत्या करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव असून तो धडगाव तालुक्यातील हातधुई येथील शासकीय आश्रमशाळेत (Ashram school nandurbar) बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. आकाशने शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचा आरोपी मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. आकाशने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर, शाळा प्रशासनाने याची माहिती कुटुंबीयांना न देता, सर्वप्रथम पोलिसांना दिली आणि घटनास्थळाचा पंचनामा करून घेतला. हेही वाचा-प्रेमविवाह करूनही नशिबी आला वनवास; आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत संपवलं जीवन तसेच मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर, शाळा प्रशासनाने याची माहिती मृत मुलाच्या कुटुंबीयांना दिली आहे. त्यामुळे कुटुंबीयांना शाळा प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. तसेच मुलाच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या शिक्षकांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली होती. पण शाळा प्रशासनाकडून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास केला जात आहे. हेही वाचा-रंगीत स्वप्न दाखवून आयुष्य करायचे बेरंग; गरीब मुलींना परराज्यात घेऊन जायचे अन्.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेपासून काही अंतरावर असणाऱ्या एका खोल दरीतील झाडाला गळफास घेत विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सहायक जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी घटनेचा आढावा घेतला असून मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दोन लाखांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तसेच चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Suicide

    पुढील बातम्या