मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाघोबानं वधू-वरासह वऱ्हाडींची केली हवा टाईट, घरातच बांधावी लागली लग्नगाठ

वाघोबानं वधू-वरासह वऱ्हाडींची केली हवा टाईट, घरातच बांधावी लागली लग्नगाठ

Marriage in Buldhana: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव याठिकाणी धामधूमीने लग्न सुरू असताना ऐन लग्नाच्या मुहूर्तावर गावात वाघ शिरल्याची घटना समोर आली आहे. वाघाच्या भीतीने वधू-वरासह वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धांदल उडाली आहे.

खामगाव, 12 डिसेंबर: गेल्या आठवडाभरापासून बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव परिसरात वाघाचा वावर वाढला आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या व्यक्तीला वाघाचं दर्शन घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशा स्थितीत धामधूमीने लग्नसोहळा सुरू असलेल्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे. ऐन मुहूर्ताच्या वेळी परिसरात वाघाने शिरकाव (Tiger enters at marriage venue) केल्याची चर्चा सुरू झाल्याने भावी नवरी-नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींची हवा टाईट झाली आहे.

वाघाच्या भीतीने संबंधित दाम्पत्याला बंद खोलीतच लग्नगाठ बांधावी लागली आहे. मोठ्या धामधुमीनं लग्न करण्याची स्वप्न पाहणाऱ्या दाम्पत्याचा  भ्रमनिराश झाला आहे. बंद खोलीत लग्न उरकल्यानंतर, त्याचं खोलीत जेवणाच्या पंगती बसवण्यात आल्या. वाघाच्या दहशतीमुळे बंद खोलीत लग्न करावं लागल्याने परिसरात या लग्नाबाबत खमंग चर्चा रंगत आहेत.

हेही वाचा-औरंगाबाद: पेढा खाताच हरपली शुद्ध; शेजारच्या तरुणाचं विवाहितेसोबत विकृत कृत्य

खरंतर, गेल्या आठवडाभरापासून खामगाव परिसरात वाघ असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दररोज कोणाला ना कोणाला तरी वाघाचं दर्शन घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र वाघ सापडत नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये वाघाची भीती अधिकच गडद होतं होती. अशात शुक्रवारी रात्री घाटपुरी नाका परिसरात वाघ घुसल्याची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली.

हेही वाचा-VIDEO: कोल्हापुरात गव्याचा धुमाकूळ; पोटात शिंग खूपसल्याने तरुणाचा दुर्दैवी अंत

अशात याच परिसरात एकेठिकाणी लग्नाची धामधूम सुरू होती. गावात वाघ शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी विवाहस्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांना पाहून पाहुणे मंडळीमध्ये घबराट सुरू झाली. यामुळे नवरी नवरदेवासह वऱ्हाडींनी रस्ता दिसेल तिकडे पळायला सुरुवात केली. ऐन लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी वाघाचं व्यत्यय आल्याने, ज्येष्ठांनी पुढाकार घेत, मोजक्या नातेकाईकांच्या उपस्थितीत एका बंद खोलीत हा विवाह पार पाडला आहे. अक्षता पडल्यानंतर जेवणाच्या पंगतीही त्याच खोलीत बसवल्या. दरम्यान अन्य वऱ्हाडी मंडळींना शेजारच्या लोकांनी आसरा दिला होता.

First published:
top videos

    Tags: Buldhana news, Marriage, Tiger