सातारा, 09 जानेवारी : साताऱ्यामध्ये (Satara) नव्या निर्माण झालेल्या ग्रेड सेपरेटर भुयारी मार्गावरून राजकीय आखाडा तापला आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले ( (udayanraje bhosale) ) यांनी महाविकास आघाडीला दणका देत उद्घाटन करून टाकले होते. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीने साताऱ्यात दाखल अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. त्यामुळे लवकरच शासकीय उदघाटन सोहळा होणार असे बोलले जात आहे.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारला धक्का देत साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी उदघाटन उरकले होते. त्यानंतर साताऱ्यात अनेक घडामोडी घडल्या. ग्रेड सेपरेटरवरील नाम फलक फाडल्याने तणाव निर्माण झाला होता आणि यानंतर लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत
10000 रुपयांपर्यंत स्वस्त झाला भारतातील पहिला 5G स्मार्टफोन;जाणून घ्या नवी किंमत
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बांधकाम विभाग आणि महसूल खात्यातील अधिकाऱ्यांशी त्यांनी कमराबंद चर्चा केली. या झालेल्या बैठकीत मात्र अजित पवार काय म्हणाले हे मात्र गुलदस्त्यात असलं तरी साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर च्या उद्घाटनावरून वाद पेटणार असून दुसऱ्यांदा शासनाच्या वतीने उदघाट्न होणार असल्याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्या आहेत.
संभाजीराजेंच्या फलक फाडल्यामुळे वाद
दरम्यान, शहरातील ग्रेड सेपरेटच्या रस्त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे बॅनर लावण्यात आले होते. शुक्रवारी रात्री अज्ञात समाजकंटकांनी छत्रपती संभाजीराजे भोसले मार्गावरील हे फलक फाडल्याचा प्रकार सकाळी समोर आला. या घटनेमुळे छत्रपती प्रेमींकडून निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारीच उदयनराजे भोसले यांनी भुयारी मार्गाची पाहणी केली होती. यावेळी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.
गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिले चौकशीचे आदेश
तर दुसरीकडे साताऱ्यातील ग्रेड सेपरेटर वर लावण्यात आलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे नाम फलक अज्ञात व्यक्तीने फाडल्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तसंच भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेयांनी जमवलेल्या गर्दीची चौकशी करणार असल्याचेही सांगितले आहे.
इंडोनेशियाचं विमान उड्डाणानंतर बेपत्ता; 50 हून अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात
उदयनराजे समर्थक आणि शिवप्रेमी दाखल होताच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. 'जे कोणी हे कृत्य केले आहे त्याचा शोध पोलीस घेतील आणि कडक कारवाई करण्यात येईल, नागरिकांनी शांतता राखावी, असं आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.