पुण्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची एण्ट्री झाल्यानंतर 3 किमीचा परिसर सील

पुण्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाची एण्ट्री झाल्यानंतर 3 किमीचा परिसर सील

शहरात झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे.

  • Share this:

इंदापूर, 29 एप्रिल : पुणे शहरात गेल्या गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात झोपडपट्टी आणि दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. असं असलं तरीही पुण्याच्या ग्रामीण भागातील काही तालुके मात्र कोरोनाच्या संकटापासून आतापर्यंत दूर होते. मात्र मंगळवारी इंदारपूर तालुक्यातील भिगवण इथं एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली.

इंदापूर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली. तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खबरदारीचे उपाय सुरू केले असून भिगवण स्टेशन परिसरातील तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर सील करण्यात आला आहे.

हेही वाचा - EXCLUSIVE : ...आणि पुण्यात अख्ख्या पोलीस स्टेशनचा जीव भांड्यात पडला!

दरम्यान, पुण्यात मंगळवारी 24 तासात तब्बल 122 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. ही आजपर्यंतची सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे एकट्या पुणे शहरातील कोरोना रूग्णांची संख्या 1339 वर जाऊन पोहोचली आहे, तर जिल्ह्यात हीच आकडेवारी 1491 वर गेली आहे. गेल्या चोवीस तासात आणखी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरातील मृतांचा आकडा 79 तर जिल्ह्यातली मृतांची संख्या 83 वर गेला आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 29, 2020, 5:07 PM IST

ताज्या बातम्या