तीन राज्यात पराभवाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का? खडसे म्हणतात...

तीन राज्यात पराभवाचा महाराष्ट्रावर परिणाम होईल का? खडसे म्हणतात...

तीन राज्यांतील निवडणुकांमधील पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली.

  • Share this:

राजेश भागवत, प्रतिनिधी

जळगाव,12 डिसेंबर : तिन्ही राज्यांत निवडणुकीच्या निकालांवर संघटनात्मक आणि अन्य मुद्द्यांचे काय परिणाम झाले ते शोधून महाराष्ट्रात पुढील निवडणुकांच्या दृष्टीने मजबुती आणण्याचे प्रयत्न करावे लागतील, असं मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं.

तीन राज्यांतील निवडणुकांमधील पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. "कुठल्याही निवडणुकांमधील विजय किंवा पराजयाचा परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर होत असतो. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील. मात्र, महाराष्ट्रात सरकार विरोधात नाराजीचा परिणाम निवडणुकांमध्ये होणार नाही असं खडसे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "मध्य प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात पंधरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. या तिन्ही राज्यांत भाजप विकास कामांबाबत अग्रेसर राहिला हे मान्य करावं लागेल. अर्थात पंधरा वर्षांनंतर सरकार विरोधातील नाराजीचा फटका बसू शकतो. याबाबत आत्मचिंतन करावं लागेल आणि पराभवाची कारणे शोधावी लागतील,"

मोदी लाट ओसरली काय या प्रश्नाला खडसे यांनी थेट उत्तर दिले नाही. मात्र, ते म्हणाले, "लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदींनी विकासाच्या नावावर मतं मागितली होती. आज निवडणुका झालेल्या तिन्ही राज्यांत विकास झाला हे मतदारही मान्य करतात. मात्र, शेवटी मतदार राजा आहे. कुणाला मत द्यायचं कुणाला नाही हा त्याचा अधिकार आहे."

===================================

First published: December 12, 2018, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading