मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Narayan Rane arrested : अटकेनंतर नारायण राणेंचं ब्लड प्रेशर वाढलं, प्रकृती बिघडली

Narayan Rane arrested : अटकेनंतर नारायण राणेंचं ब्लड प्रेशर वाढलं, प्रकृती बिघडली

केंद्रात मंत्री झालेले नारायण राणे यांना आज सर्वात मोठा धक्का बसला. अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे.

केंद्रात मंत्री झालेले नारायण राणे यांना आज सर्वात मोठा धक्का बसला. अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे.

केंद्रात मंत्री झालेले नारायण राणे यांना आज सर्वात मोठा धक्का बसला. अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे.

    संगमेश्वर, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर राणे यांची प्रकृती बिघडली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. (Union Minister Narayan Rane arrested) केंद्रात मंत्री झालेले नारायण राणे यांना आज सर्वात मोठा धक्का बसला. अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं असा सल्ला डॅाक्टरांनी पोलीस अधिक्षक यांना दिला आहे. 'नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. आज गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहाणी करत असताना रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले. तेथून त्यांना संगमेश्वर पोलुस ठाण्यात नेले. तेथे त्यांना बाहेर गाडीतच बसवून ठेवले आहे. त्यांचा रक्तताप वाढला असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे परंतु त्यांना वैद्यकीय मदतही दिली जात नाहीये असा आरोप प्रसाद लाड यांनी केला. तसंच, नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले असेही ते म्हणाले. नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचं एक पथक कोकणाकडे रवाना झालं होतं. त्यानंतर नारायण राणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली. रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली आहे. त्यानंतर आता नाशिक पोलिसांकडे नारायण राणे यांचा ताबा दिला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणेंना घेऊन पोलिसांचं पथक रत्नागिरीकडे रवाना झालं आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या