Home /News /maharashtra /

शरद पवारांनंतर गोपीचंद पडळकरांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच दिले आव्हान

शरद पवारांनंतर गोपीचंद पडळकरांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच दिले आव्हान

येत्या 16 मार्च रोजी औंढा नागनाथ इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

  मुंबई, 07 मार्च :  या ना त्या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारविरोधात (MVA Goverment) रस्त्यावर उतरणारे भाजपचे (BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनाच आव्हान दिले आहे. जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) पुतळ्याचे जसे अनावरण केले होते तसाच प्रयोग औंढा नागनाथ (Aundha Nagnath) इथं करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले आहे. मागील महिन्यात जेजुरी इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजित करण्यात आले होते. पण त्याआधीच गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी पहाटे जाऊन पुतळ्याचे अनावर केले होते. त्यामुळे राज्यात एकच राजकीय वाद उफाळून आला होता. येत्या 16 मार्च रोजी औंढा नागनाथ इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 'आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण आम्ही करणार आहोत. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुतळ्याचे अनावर करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे सर्व समाजाच्या वतीने येत्या 16 तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत, अशी घोषणाच पडळकर यांनी केली आहे', असं वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. आईप्रमाणेच जान्हवी कपूरही आहे मेहनती; कसं असतं अभिनेत्रीचं फिटनेस रुटीन एवढंच नाहीतर गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावर करण्यासंदर्भातील कार्यक्रमपत्रिका जाहीर केली आहे. ही कार्यक्रम पत्रिका दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमासाठी वेळच नव्हता, असा आरोप केला आहे. जेजुरी इथं अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे केले होते अनावरण 12 फेब्रुवारी रोजी जेजुरी संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याचं जाहीर केलं होतं. 13 फेब्रुवारी अर्थात उद्या शनिवारी शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होणार होतं पण त्याआधीच गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटेच त्याचं उद्घाटन उरकून टाकलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये एकच वाद पेटला होता.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: BJP, Gopichand padalkar, Maharashtra, Modi government, PM narendra modi, Sangli, Uddhav thackeray

  पुढील बातम्या