• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • विठुरायाचं दर्शन घेऊन घरी आले अन् दाम्पत्याने घेतला गळफास, 2 चिमुरडी झाली पोरकी!

विठुरायाचं दर्शन घेऊन घरी आले अन् दाम्पत्याने घेतला गळफास, 2 चिमुरडी झाली पोरकी!

सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, किंवा आर्थिक अडचणही नव्हती.

सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, किंवा आर्थिक अडचणही नव्हती.

सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, किंवा आर्थिक अडचणही नव्हती.

  • Share this:
उल्हासनगर, 21 नोव्हेंबर : पंढरपूरची (pandharpur) वारी करून आल्यानंतर एका दाम्पत्याने आत्महत्या (couple committed suicide ) केल्याची मन हेलावून टाकणारी घटना उल्हासनगरमध्ये (ulhasnagar) घडली आहे.  पती पत्नीनं एकाच वेळेस गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, या दोघांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे अजून स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प 1 मधील  राजीव गांधी नगर परिसरात आज सकाळी ही घटना घडली.  सचिन आणि शर्वरी सुतार असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. सचिन आणि शर्वरी हे आपल्या ७ आणि ४ वर्षांच्या दोन मुलांसह वास्तव्याला होतं. आज सकाळी या जोडप्यानं घरातच गळफास घेतल्याचं त्यांच्या मुलांनी पाहिलं आणि शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शेजाऱ्यांना एकच धक्का बसला. त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना; ग्रामपंचायतींना या तारखेपर्यंत अर्ज करा सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, किंवा आर्थिक अडचणही नव्हती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. आत्महत्या करण्यापूर्वी सचिन सुतार हे पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन आले होते. त्यानंतर शुक्रवारी ते शर्वरी यांच्या माहेरी चिपळूणला जाऊन आले होते.  तसंच शनिवारी ते सचिन यांच्या वडिलांकडे डोंबिवलीला जाऊन आले होते. "मुख्यमंत्री साहेब सर्व वर्गांच्या शाळा सुरु करा"; मुंबईतील पालकांची मागणी त्यानंतर शनिवारी रात्री मुलं झोपल्यानंतर त्यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनंतर त्यांची दोन लहान मुलं मात्र पोरकी झाली आहेत. या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
Published by:sachin Salve
First published: