मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुख्यमंत्री Uddhav Thackeray लवकरच कुटुंबासह 'मातोश्री 2' मध्ये करणार गृहप्रवेश

मुख्यमंत्री Uddhav Thackeray लवकरच कुटुंबासह 'मातोश्री 2' मध्ये करणार गृहप्रवेश

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही लवकरच आपल्या नव्या घरात कुटुंबासह राहायला जाणार आहेत.

मुंबई, 09 नोव्हेंबर: नुकतंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Maharashtra Navnirman Sena president) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवीन घरात (New House) गृहप्रवेश केला. आता राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आपल्या कुटुंबासह नव्या घरात गृहप्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)लवकरच कुटुंबीयांसह मातोश्री-2 (Matoshri-2) मध्ये गृहप्रवेश करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री बंगल्यासमोरच मातोश्री-२’ इमारत बांधण्यात आली आहे.

हेही वाचा- खंडणी वसूल करण्यासाठी किरण गोसावीनं आखला होता 'असा' मोठा प्लान

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा नवीन घरात गृहप्रवेश करणार असल्यानं याची चर्चा रंगली आहे.

Raj Thackeray यांचा नव्या घरात गृहप्रवेश

6 नोव्हेंबरला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या नव्या घरात (New House) प्रवेश केला. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते नव्या घराच्या नामफलकाचं पूजन करण्यात आलं. शिवतीर्थ असं या नव्या घराचं नाव असणार आहे. राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत ठाकरे कुटूंबीयांनी गृहप्रवेश केला आहे. दादर येथील 'कृष्णकुंज'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधली आहे.

कृष्णकुंज शेजारीचं नवं घर

राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समीकरणच वेगळं आहे. दादरमध्ये कृष्णकुंज म्हणजे राज ठाकरे यांचं घर डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र आता राज ठाकरेंची निवासस्थानाची ओळख आता बदलली आहे. कृष्णकुंज शेजारीच 5 मजली इमारत हेच राज ठाकरेंचं नवं घर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे कृष्णकुंज येथे वास्तव्यास आहेत. राज ठाकरे यांना भेटायचं झाल्यास सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते कृष्णकुंजवर भेटायला येतात.

कसं आहे राज ठाकरेंचं नवं घर

कृष्णकुंज शेजारीच राज ठाकरेंचं 5 मजली घर असेल. घराच्या पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था केली आहे. तसंच याच इमारतीत कार्यालयही असतील. या इमारतीत पक्षाच्या बैठका, भेटीगाठी आयोजित करण्यात येतील. अन्य मजल्यांवर ठाकरे कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली आहे. राज ठाकरेंच्या या नव्या घरात भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे. या नव्या घराच्या उभारणीचे काम अंदाजे 2 ते 2.5 वर्षे सुरू होतं. घराचा दर्शनी भाग शिवाजी पार्कच्या दिशेनं आहे.

हेही वाचा- पुण्यातल्या अग्नितांडवाचा Live Video, मध्यरात्री फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या तळमजल्यावर पक्ष कार्यालयीन कामासाठी, म्हणजेच पक्ष बैठका आणि पक्ष प्रवेश, पत्रकार परिषदा यांसारखे इव्हेंट होण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्याशिवाय घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर अत्याधुनिक जिमही आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त डायनिंग हॉल आहे. राज ठाकरेंच्या या नव्या घरात होम थिएटर आहे.

First published:
top videos

    Tags: Aaditya thackeray, Shivsena, Uddhav Thackeray (Politician)