पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उधळला घातपाताचा कट?

पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं उधळला घातपाताचा कट?

पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत स्फोटकं जप्त केली आहेत.

  • Share this:

पालघर, विजय राऊत, 8 मार्च : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आहे. बोईसर - चिल्हार फाटा येथे पालघरच्या बोईसर स्थानिक गुन्हे शाखा युनिटने जिलेटिन आणि डिटोनेटरनं भरलेले दोन टेम्पो जप्त केले आहेत. गुजरातहून हे दोन्ही टेम्पो आले. दरम्यान, चेक नाका असताना देखील टेम्पोतून स्फोटकं आणली कशी? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याप्रकरणामध्ये सध्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमिवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या स्फोटकाबद्दल आता अधिक तपास करण्यात येत आहे. यापूर्वी देखील पालघरमध्ये 24 डेटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट सापडलं होतं.

स्फोट करून असा उद्धवस्त करण्यात आला नीरव मोदीचा 100 कोटींचा बंगला, पाहा VIDEO

यापूर्वी देखील स्फोटकं जप्त

पुलवामा हल्ल्यानंतर देशातील प्रमुख ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. शिवाय, अनेक ठिकाणी हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. यापूर्वी कर्जत येथे एसटीमध्ये बॉम्ब सापडला होता. शिवाय, 4 मार्च रोजी पालघरमध्ये देखील 24 डेटोनेटर आणि अमोनियम नायट्रेट सापडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली होती.

पुलावामा हल्ल्यानंतर दहशतवादी जम्मू - काश्मीरच्या बाहेर देशातील इतर शहरांना लक्ष्य करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय, मुंबईतील रेल्वे स्थानकं आणि लोकलच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमिवर आता पालघरमध्ये सापडलेल्या स्फोटकांचं गांभीर्य वाढलं आहे.

दरम्यान, ही स्फोटकं महाराष्ट्रात आली कशी? त्याचा उद्देश काय याबद्दल आता तपास सुरू करण्यात येत आहे.

VIDEO :भाजप आमदाराची जीभ घसरली; दिग्विजय सिहांबाबत वादग्रस्त विधान

First published: March 8, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading