मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : पालघरनंतर सांगलीमध्ये साधूंसोबत भीषण कृत्य; पंढरपूरला जाताना चारजणांना बेदम मारहाण

Video : पालघरनंतर सांगलीमध्ये साधूंसोबत भीषण कृत्य; पंढरपूरला जाताना चारजणांना बेदम मारहाण

या घटनेचा एक Video समोर आला आहे, यापूर्वी पालघरमध्येही असाच प्रकार समोर आला होता.

या घटनेचा एक Video समोर आला आहे, यापूर्वी पालघरमध्येही असाच प्रकार समोर आला होता.

या घटनेचा एक Video समोर आला आहे, यापूर्वी पालघरमध्येही असाच प्रकार समोर आला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

सांगली, 13 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील चार साधुंना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुले चोरणारी टोळी समजून या चार साधुंना बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली. कर्नाटकातून जतमार्गे पंढरपूरकडे देवदर्शनासाठी जाताना या चार साधूंना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गेल्या वर्षी दरोडेखोर असल्याचं समजून साधू आणि त्यांच्या चालकांनी गावकऱ्यांनी मारहाण केली होती. यात साधूसह त्याच्या चालकाचा मृत्यू झाला होता. साधूंनी आपण नाशिकचे असून गुरुंच्या अंत्यदर्शनासाठी जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र तरीही त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. ही दगडफेक इतकी भीषण होती की, यात एका साधूचा दुर्देवी अंत झाला होता.

या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान सांगलीमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. साधूंना मुले चोरणारी टोळी समजून बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली आहे. हे चारही साधू उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Crime, Palghar, Sangali