पुरोगामी महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना, 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा!

पुरोगामी महाराष्ट्रातील ऐतिहासिक घटना, 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा!

या बातमीमुळे एक वेगळाच आदर्श लोकांसमोर मांडण्यात आला आहे. सगळीकडे सध्या या बातमीची चर्चा आहे. तर 4 सुनांचं कौतूकही होतं आहे.

  • Share this:

बीड, 09 सप्टेंबर : सासू-सूनांमधले वाद सगळ्यांनी पाहिले आहेत. यातून गुन्ह्यांच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. पण सासू ही आपल्या आईसारखी असते असं एक उत्तम उदाहरण बीडमध्ये समोर आलं आहे. सासूचं निधन झाल्यानंतर 4 सुनांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला असल्याचं बीडच्या काशिनाथ नगरमध्ये घडलं आहे. या बातमीमुळे एक वेगळाच आदर्श लोकांसमोर मांडण्यात आला आहे. सगळीकडे सध्या या बातमीची चर्चा आहे. तर 4 सुनांचं कौतूकही होतं आहे.

बीड शहरातील काशिनाथ नगरमधील सुंदरबाई दगडू नाईकवाडे यांचं 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवारी पहाटे निधन झालं. सुंदरबाई यांना 4 सुना आहेत. त्यांनी चौघींनाही काय मुलीप्रमाणे वागवलं. कधीही त्यांच्यात भेदभाव केला नाही. लेकीप्रमाणे सांभाळल्यामुळे सुनांचंदेखील सासूवर प्रेम होतं. मात्र, गौरी-गणपतीचा सण संपताच सुंदराबाईंचं निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. सकाळी अंत्यविधी निघाली त्यावेळी मुलांनी आणि जावयांनी खांदा दिला. पण आमच्या आईला आम्ही खांदा देणार असं म्हणत चौघी सुनांनी सुंदराबाई यांच्या पार्थिवाला खांदा दिला. अजूनही अनेक ठिकाणी महिलांना साधं स्मशानभूमित जाण्यासही परवानगी नाही अशा भूमिवर महिलांनी पार्थिवाला खांदा देण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.

चोघींनी प्रेमापोटी प्रथेला आणि परंपरेला फाटा देत अंत्ययात्रेत पार्थिवाला खांदा दिला. परंपरेला मोडीत काढून स्त्रीला सुख दुःखामध्ये समान अधिकार असावेत असा उत्तम संदेश या निमिताने समाजापुढे ठेवला आहे. सुशिक्षित असलेल्या नाईकवाडे कुटुंबानी दुःखामध्ये पण सामाजिक संदेश दिला. लता नवनाथ नाईकवाडे, उषा राधाकिसन नाईकवाडे, मनीषा जालिंदर नाईकवाडे आणि मीना मच्छिंद्र नाईकवाडे अशी 4 सुनांची नावं आहे.

'गौरी-गणपतीचा सण आनंदात पूर्ण झाला. पण यावेळीदेखील आम्ही सगळे एकत्र होतो. ते आमच्या सासूबाईंमुळे. सासूबाई सोबत होत्या. त्यांनीच आम्हाला सन्मानाने वागायला शिकवलं. घरात कधीच भेदभाव केला नाही. त्या अचानक निघून गेल्याने धक्का बसला आहे. त्यांचं आमच्यावर खुप प्रेम होतं. म्हणून आम्ही चौघींनी ठरवलं की मूलं म्हणून आमचे पती खांदा देतील पण आमच्यावर तेवढंच प्रेम आहे म्हणून आम्ही चोघीदेखील खांदा देणार. या निर्णयात कुटुंबीयांनीही संमती दाखवली.' असं लता नाईकवाडे म्हणाल्या.

महालक्ष्मीचे रुप समजून सासूबाईंनी केली आपल्या दोन्ही सुनांची पूजा...

वाशीम इथेही सासू-सुनांचं एक अनोखं नात पाहायला मिळालं. ड्रीम लॅन्ड सिटी इथे राहणार्‍या श्रीमती सिंधुबाई सुभाष सोनुने यांनी अनोख्या पद्धतीने गौरीपूजन (महालक्ष्मी ) सोहळा साजरा केला. आपल्या दोन्ही सुनांना देवी स्वरुपात विराजमान करून त्यांची पूजा केली. सिंधुबाई यांनी सगुण जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मींचे पूजन करून समजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.

सासू-सुनामधील जिव्हाळा कायम राहावा..

सिंधुबाई यांना दोन मुले आहेत. विशेष म्हणजे सिंधुबाई यांची एक सून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका तर दुसरी गृहिणी आहे. रेखा सचिन सोनुने आणि पल्लवी प्रमोद सोनुने अशी सिंधुबाईंच्या सूनांची नावे आहेत. सासू आणि सुनामधील सलोखा आणि जिव्हाळा कायम राहावा, हा या मागील आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने यांनी सांगितले. दरम्यान, सिंधुबाई यांच्या घरातील गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

VIDEO : आदर्श! 4 सुनांनी दिला सासूच्या पार्थिवाला खांदा

Published by: Renuka Dhaybar
First published: September 9, 2019, 3:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या