मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वाघाने खेळवले आणि लोळवले, संजय राऊतांचा पाटलांना सणसणीत टोला

वाघाने खेळवले आणि लोळवले, संजय राऊतांचा पाटलांना सणसणीत टोला

'चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ते गोड आणि निरागस आहेत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर लहान मुलासारखा आनंद घ्यायचा'

'चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ते गोड आणि निरागस आहेत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर लहान मुलासारखा आनंद घ्यायचा'

'चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ते गोड आणि निरागस आहेत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर लहान मुलासारखा आनंद घ्यायचा'

धुळे, 10 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांच्या दिल्लीतील भेटीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा काही थांबायचे नाव घेत नाहीये. 'चंद्रकांत पाटील हे लहान मुलासारखे आहे, आनंद घ्या, मुळात वाघाने खेळवले आणि लोळवले आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी आता सणसणीत टोला लगावला आहे.

संजय राऊत उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना भाजपचे प्रदेशा चंद्रकांत पाटील यांनी  'आमची मैत्री जंगलातल्या वाघाची आहे, पिंजऱ्यातल्या नाही' असं वक्तव्य केलं होतं, त्याला प्रत्युत्तर दिलं.

चंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. ते  गोड आणि निरागस आहेत. त्यामुळे त्यांनी काही म्हटलं तर लहान मुलासारखा आनंद घ्यायचा.  वाघ ठरवेल कुणाशी मैत्री करायची की नाही. मुळात आतापर्यंत वाघाने खेळवले आणि लोळवले सुद्धा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

तसंच, पक्ष संघटनेत शिथीलता यायला नको म्हणून हा दौरा करत आहे. कोरोनाच्या काळात लोकांना भेटता आले नाही त्यामुळे भेटीगाठी सुरू आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

VIDEO: नवी वकील देविसिंगला फासावर लटकवणार? की फसणार डॉक्टरच्या जाळ्यात?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्लीला जाऊन आले. त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पण मुळ प्रश्न बाजूला राहिला आणि माध्यमांमध्ये वेगळीच चर्चा सुरू आहे. सरकार समजुतीने चाललेलं आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.

'पाटील यांना गोडधोड खाऊ घाला'

दरम्यान, नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी पाटलांना चांगलीच कोपरखळी लगावली होती.

'राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहे. ठीक आहे ते आमच्यावर टीका करता, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. पण, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात, त्यांना गोडधोड खाऊ घालावे, केक कापावे,  गोड माणूस आहे, अशी कोपरखळी राऊत यांनी लगावली होता.

अरे बापरे! कोरोना लस घेतली आणि धाडकन जमिनीवरच कोसळला; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

'राजकीय घडामोडींना वेग वगैरे मला माहिती नाही. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर भाजपमध्ये हालचालींना वेग आला असेल तर तो त्यांच्या पक्षातील मुद्दा आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठका सुरू आहे, अशी माहितीही राऊत यांनी दिली.

First published:
top videos

    Tags: Sanjay raut