घरगुती भांडणात पत्नीला मारहाण करून पतीची आत्महत्या

घरगुती भांडणात पत्नीला मारहाण करून पतीची आत्महत्या

रागाच्या भरात अशोक यांनी ही कृती केली असली तरी पोलीस सर्वच शक्यतांना गृहीत धरून तपास करत आहेत.

  • Share this:

बीड 26 मे : पती-पत्नी मधील शुल्लक भांडणात पतीने पत्नीला मारहाण केली. यात बेशुद्ध आणि रक्ताने माखलेली पत्नी पाहिल्यानंतर पतीने मारहाणीच्या पश्‍चातापातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी बीड शहरातील भक्ती कन्स्ट्रक्शन मध्ये घडली आहे.या मारहाणीत मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बीड शहरातील अशोक बाबूराव मस्के आणि त्यांच्या पत्नी किरण यांच्यामध्ये आज सकाळी किरकोळ भांडण झाले. भांडण अगदी विकोपाला गेल्याने पतीने पत्नीला मारहाण केली. यात जखमी झालेल्या किरण मस्के यांना त्यांच्या मुलीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र इकडे घरी मारहाणीच्या पश्‍चातापातून अशोक बाबूराव मस्के (वय ६२) यांनी राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती आजुबाजुच्या लोकांना झाल्यानंतर घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याला कळविण्यात आली.

पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला आणि त्यातूनच हा प्रकार घडला, असे सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस करत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. तर हकनाक जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

या नवरा बायकोमध्ये भांडणं व्हायची मात्र ते भांडण कधी असं रुप घेईल असं वाटतं नाही अशी प्रतिक्रिया शेजाऱ्यांनी व्यक्त केली. रागाच्या भरात अशोक यांनी ही कृती केली असली तरी पोलीस सर्वच शक्यतांना गृहीत धरून तपास करत आहेत.

Tags:
First Published: May 26, 2019 07:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading