Home /News /maharashtra /

'डोक्याची केसं पार पांढरी झाली', राजकारणावर रोहित पवारांची टोलेबाजी,VIDEO

'डोक्याची केसं पार पांढरी झाली', राजकारणावर रोहित पवारांची टोलेबाजी,VIDEO

'आतापर्यंत ईडीची (ED) नोटीस कोणत्याही भाजप (BJP) नेत्याला आलेली नाही. ती अन्य पक्षातील लोकांना म्हणजे

जळगाव ,24 जानेवारी :  'आतापर्यंत ईडीची (ED) नोटीस कोणत्याही भाजप (BJP) नेत्याला आलेली नाही. ती अन्य पक्षातील लोकांना म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना आलेली असल्याचे  पाहायला मिळाले आहे ,या सर्वांचा अभ्यास केला तर केंद्र सरकार ईडी चा वापर हा राजकारणासाठी तर करत नाही ना अशी शंका निर्माण होत आहे', असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. आमदार रोहित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. डॉ. भूषण मगर यांच्या विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि युवकांशी संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना बोलत होते. यावेळी आपल्या डोक्याचे केसे पांढरे झाले आहे, असं गंमतीशीर विधान त्यांनी केलं. 'राजकारणात आल्यावर आपले पन्नास टक्के केस पांढरे झाले आहे, जनतेचे प्रश्न सोडविता असताना स्वतःच्या विचार न करता जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पहिले प्राधान्य द्यावे लागते, त्याला वेळ द्यावा लागतो हे करत असताना अनेक वेळा स्ट्रेस ला सामोरे जावे लागते, पूर्वी सारखं राजकारण आता सोपं राहील नसल्याने सध्या राजकारणात मोठा ताणतणाव असल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे केस पांढरे झाले आहे, असं आपण म्हटल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. 'युवकांमध्ये मोठी ताकद आहे, या ताकदी ला जर आपण योग्य दिशा देऊ शकलो नाही तर ही ताकद वाया जाऊ शकते आणि चुकीच्या मार्गाने लागली तर मोठ्या प्रमाणावर अडचणी येऊ शकतात. युवकांना ताकद देण्यासाठी आघाडी सरकार सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे, युवकांनी आपला वापर कोणी करून घेणार नाही याची काळजी घ्यायला हवी', असंही रोहित पवार म्हणाले.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या