Home /News /maharashtra /

जळगावात भाजपला बसणार आणखी एक मोठा झटका, जाहिरातीतून दिले नेत्याने संकेत

जळगावात भाजपला बसणार आणखी एक मोठा झटका, जाहिरातीतून दिले नेत्याने संकेत

या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही.

    इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 11 डिसेंबर : ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी भाजपला (BJP)रामराम ठोकून राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला गळती लागली आहे. त्यामध्ये आता एका आमदाराचा समावेश झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या आमदाराने जाहीरपणे याचे संकेतच दिले आहे. भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा आज वाढदिवस आहे. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात. पण, यंदा जाहिरात देण्यात आली आहे पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही. फक्त एक खेळाडू सोडून 2003 वर्ल्ड कपची 'टीम इंडिया' निवृत्त मात्र, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा फोटो जाहिरातींमध्ये असल्याने भाजप आमदार संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. संजय सावकारे यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व वृत्तपत्रातून जाहिराती दिल्या आहे. पण जाहिरातींमध्ये भाजप नेत्यांचे फोटो गायब आहे. पण या जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे  तर दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांचे छायाचित्रे छापण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान आमदार संजय सावकारे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर? असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. माझ्या सगळ्या माणसांना फोडू नका...' पंकजा मुंडेंचा रोहित पवारांना टोला संजय सावकारे हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते. 2009  मध्ये एकनाथ खडसे यांच्या वरदहस्ताने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढलवून जिंकून आले होते. आता एकनाथ खडसे यांनी हातात घड्याळ बांधून राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये एकनाथ खडसे असतांना त्यांचे निकटवर्तीय असलेले संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये जाणार का ? असा सवाल उपस्थितीत झाला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या