• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • बीडमध्ये आणखी एका ST कर्मचाऱ्याची विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

बीडमध्ये आणखी एका ST कर्मचाऱ्याची विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

दोन दिवसांपूर्वीच आष्टीमध्ये एका एसटीचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा एका बसचालकाने...

दोन दिवसांपूर्वीच आष्टीमध्ये एका एसटीचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा एका बसचालकाने...

दोन दिवसांपूर्वीच आष्टीमध्ये एका एसटीचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा एका बसचालकाने...

  • Share this:
बीड, 07 नोव्हेंबर:  गेल्या 4 दिवसांपासून बीड जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा  (ST bus workers strike) बेमुदत संप सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच आष्टीमध्ये एका एसटीचालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा एका बसचालकाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा (Attempted suicide) प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या दिवसात आंदोलन करावे लागत आहे. मात्र तरीही राज्य सरकार आणि शासन कोणतीही दखल घेत नाही. यामुळे संतप्त झालेल्या 35 वर्षीय एसटी चालकाने, बीडच्या बसस्थानकातील आंदोलनस्थळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अमोल कोकडवार असं या एसटी चालकाचे नाव आहे. अमोल यांनी विषारी औषध प्राशन केल्याचं लक्षात येताच बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ एका मोटारसायकलवर बसवून जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. UPDATE : पडळकरांच्या गाडीसह 3 गाड्यांचा तोडफोड, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जखमी दोन दिवसांपूर्वीच,बसस्थानकात विषारी द्रव्य प्राशन करून चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) प्रयत्न केला.  बीड जिल्ह्यात कडा बस स्थानकावर ही घटना उघडकीस आली. बाळू महादेव कदम (वय 35) असे चालकाचे नाव आहे. तो आष्टी येथील रहिवासी आहे. आष्टी येथील बाळू महादेव कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. ठुमक्या'मधून वेळ मिळाला तर बीडकडे बघा, विनायक मेटेंचा धनंजय मुंडेंना टोला या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. दुपारी आष्टी आगारातून जामखेड-पुणे बस ( MH 20,BL 2086 ) घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक बाळू कदम यांनी बसस्थानक परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. राज्यभरात एसटी बसचालकांचा संप सुरू आहे, पण तरीही आष्टी बस स्थानक का सुरू आहे, या मागणीसाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. कदम यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Published by:sachin Salve
First published: