मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तर दिवाळीनंतर 2 डोसची अट शिथिल करणार', आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती

'...तर दिवाळीनंतर 2 डोसची अट शिथिल करणार', आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती

'...तर दिवाळीनंतर 2 डोसची अट शिथिल करणार', आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती (फाईल फोटो)

'...तर दिवाळीनंतर 2 डोसची अट शिथिल करणार', आरोग्यमंत्र्यांनी दिली दिलासादायक माहिती (फाईल फोटो)

Rajesh Tope on vaccination: दिवाळीनंतर राज्यात एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास आणि मॉलमध्ये प्रवेश मिळण्याचे आरोग्य मंत्र्यांनी दिले संकेत.

जालना, 17 ऑक्टोबर : राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव कमी होत आहे आणि लसीकरण (Vaccination) सुद्धा वेगाने सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव केल्याने राज्य सरकारने मंदिरे, मॉल्स, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स सुरू (Temple, Malls, School, Colleges reopen) करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लोकलमध्ये (Mumbai Local Train) केवळ दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच परवानगी आहे. पण आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यानी एक मोठी दिलासादायक माहिती दिली आहे. एक डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेन, मॉल्समध्ये प्रवेश मिळण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. दसरा झाला आणि आता दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणावर लोकं गर्दी करतात, मंदिर उघडलेली आहेत अनेक कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे आणि चित्रपटगृहे देखील उघडणार...या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांची संख्या वाढतेय का आणि त्याचे प्रमाण कसे आहे याचा अभ्यास करून कोविड निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होऊ शकतो. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर अधिक असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून दिवाळीनंतर कोरोना केसेस कमी राहिल्या तर कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या व्यक्तीला टास्कफोर्सच्या सल्ल्यानुसार उघडलेल्या सर्व क्षेत्रातील उपक्रमामध्ये सहभागी होता येईल, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली आहे. 18 वर्षांखालील विद्यार्थी ट्रेननं करु शकणार प्रवास मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासात आणि विशेष सुविधांशी संबंधित नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आता 18 वर्षांखालील शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा मुंबई लोकल ट्रेननं प्रवास करु शकणार आहेत. याआधी ज्यांचं लसीकरण झालं आहे, त्यांनाच प्रवास करण्याची परवानगी होती. सध्या देशात फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोविड -19 विरुद्ध लस दिली जात आहे. मुंबईत लवकरच शाळा आणि महाविद्यालये उघडणार असल्यानं सरकारनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. यामध्ये विशेषतः ज्युनिअर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेणेकरून ते वैयक्तिकरित्या शाळा- महाविद्यालयांमध्ये उपस्थित राहू शकतील. ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्याव्यतिरिक्त, जे लोक विशिष्ट आरोग्य संबंधित समस्येने ग्रस्त आहेत, ज्यामुळे ते लस घेऊ शकत नाहीत, डॉक्टरांचं सर्टिफिकेट दाखवून ते लोकं सुद्धा सुविधांचा लाभ घेऊ शकतील. हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास 22 ऑक्टोबरपासून परवानगी कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शॉपिंग मॉल आणि मंदिरं सुरू करण्यात आली आहे. पण, अजूनही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यास नियम लागू होते. मात्र, आता 22 ऑक्टोबरपासून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घेता येणार आहे. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे टप्प्या-टप्प्याने सर्व लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहे. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृह सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे आता बंदिस्त सभागृह आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना 22 ऑक्टोबरपासून परवानगी देण्यात आली आहे.
First published:

Tags: Coronavirus, Covid19, Rajesh tope

पुढील बातम्या