मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

sambhajiraje and cm eknath shinde : संभाजीराजेंच्या नाराजीनंतर मुख्यंमत्र्यांची भेट, थेट सह्याद्रीवर बोलवत केला पाहूणचार

sambhajiraje and cm eknath shinde : संभाजीराजेंच्या नाराजीनंतर मुख्यंमत्र्यांची भेट, थेट सह्याद्रीवर बोलवत केला पाहूणचार

या सगळ्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवत भेट घेतली. यानंतर त्यांच्यात काही काळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे दिसून आले.

या सगळ्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवत भेट घेतली. यानंतर त्यांच्यात काही काळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे दिसून आले.

या सगळ्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवत भेट घेतली. यानंतर त्यांच्यात काही काळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे दिसून आले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

मुंबई, 16 सप्टेंबर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे काल(दि. 15) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी संभाजीराजे तब्बल दीड तास थांबूनही त्यांची भेट न झाल्याने नाराज होत ते तिथुन निघून गेले. या सगळ्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये रंगल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सह्याद्री अतिथीगृहावर बोलवत भेट घेतली. यानंतर त्यांच्यात काही काळ विविध विषयांवर चर्चा झाल्याचे दिसून आले. (sambhajiraje and cm eknath shinde)

संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले कि, आम्ही मराठा समाजाच्या आणि कोल्हापूर विषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मंत्रालयात आलो असल्याचे संभाजीराजे म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून संभाजीराजे यांच्या भेटीवर खुलासा केला आहे. संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली नव्हती. ते सचिवांना भेटायला आले होते.

हे ही वाचा : खासदार अमोल कोल्हे म्हणतात मुख्यमंत्रीसाहेब नवा पायंडा पाडून नका मतदार संघाच्या प्रश्नांबाबत लोकप्रतिनीधींना आमंत्रण द्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पूर्वनियोजित बैठक असल्याने त्यांना भेटता आले नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या नाराजीचे वृत्त प्रसिद्धी माध्यमांमध्ये झळकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सह्याद्री अतिथीगृहात बोलावून घेत चर्चा केली.

मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी संभाजीराजे मंत्रालयात आले होते. आधी त्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनाकडे गेले. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत मराठा समाजाचे काही समन्वयकही होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्बल दीड ते दोन तास संभाजीराजे यांना भेटलेच नाहीत. या कालावधीत ते पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत राहिले. त्यामुळे वारंवार निरोप देऊनही संभाजीराजे यांना ताटकळत राहावे लागले. या प्रकारानंतर संभाजीराजे मुख्यमंत्री कार्यालयातून तडकाफडकी निघून गेले. मुख्यमंत्र्यांना पक्ष प्रवेशासाठी आलेल्या नेत्यांना भेटण्यासाठी वेळ आहे; मात्र समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या संभाजीराजेंना भेटण्यास वेळ नाही, अशी नाराजी यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केली.

हे ही वाचा : आता राष्ट्रीय पातळीवरही एकनाथ शिंदेंचीच 'हवा', 12 राज्यांच्या प्रमुखांचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मराठा समाजाचे प्रश्न सोडवणार : मुख्यमंत्री

संभाजीराजे यांनी मराठा समाजाशी संबंधित अनेक विषयांवर आपल्याशी विस्तृत चर्चा केली. त्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करून शासनाकडून त्यावर समाधानकारक तोडगा काढला जाणार आहे. तसे आश्वासन आपण त्यांना दिले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीनंतर सांगितले.

First published:

Tags: Cm eknath shinde, Kolhapur, Sambhajiraje chhatrapati