Home /News /maharashtra /

Nanded: धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त

Nanded: धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त

धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त

धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त

Swords stock seized in Nanded: नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त करण्यात आला आहे.

नांदेड, 29 एप्रिल : धुळ्यात तलवारींचा साठा जप्त (Stock of sword seized in Dhule) केल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरुन भाजपने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्याच दरम्यान आता नांदेड (Nanded) मध्ये तलवारींचा मोठा साठा जप्त (Large stock of sword seized) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नांदेडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रिक्षातून नेण्यात येणारा तलवारींचा साठा जप्त केला आहे. त्यासोबतच एका आरोपीला अटक सुद्धा केली आहे. (Stock of swords seized from Auto in Nanded, one accused arrested) नांदेड शहरातील गोकुळनगर भागातुन ऑटोतुन शस्त्रसाठा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीने पोलिसांनी ऑटोची तपासणी केली. त्यावेळी 25 तलवारी आढळून आल्या. या प्रकरणी आकाश गोटकवाड याला पोलिसांनी अटक केली. विक्रीच्या उद्देशाने तलवारी आणल्याची कबूली त्याने दिली आहे. अमृतसर पंजाबहून रेल्वेत पार्सल करून तलवारी नांदेडला आणल्याचे आरोपी आकाश याने सांगितले आहे. यात आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. वाचा : "12वी पास व्हायचंय? मग...." कॉलेजच्या शिपायाने तरुणीकडे केली धक्कादायक मागणी धुळ्यात 89 तलावारी जप्त दोन दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ गाडीतून तलवारींचा साठा जप्त करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या चितोडगड येथून महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यात स्कॉर्पिओ गाडीतून शस्त्रास्त्रे नेले जात होते. ही गाडी आर्गा महामार्गाने जात असताना गस्तीवर असलेल्या सोनगीर पोलिसांना काही संशयास्पद हालचाली वाटल्या. त्यांनी स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला अडवलं. पोलिसांनी त्या गाडीची झडती घेतली असता गाडीत शस्त्रास्त्रे सापडले. राम कदमांचा आरोप तलवारींचा साठा जप्त करण्यात आल्यावर भाजप आमदार राम कदम यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. "महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान? जेथे कॉंग्रेसचे सरकार आहे त्या राजस्थानमधून जालना जाणार्‍या 90 तलवारी ताब्यात. याआधीच पुणे येथे तलवारी औरंगाबाद येथे जात असताना ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस या षड्यंत्रात सामील आहे का? ठाकरे सरकार याच्या मुळाशी", असा आरोप राम कदम यांनी केला आहे. वाचा : 22 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, परळीतल्या घटनेने बीड जिल्हा हादरला राज ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर अलर्ट राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्यांच्या संदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गोपनीय अहवालाचा उल्लेख करत महाराष्ट्रात 3 मे नंतर विस्फोटक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं. या सर्व घडामोडी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Autorickshaw driver, Crime, Maharashtra News, Nanded

पुढील बातम्या