कोरोनाचं संकट थैमान घालत असताना उद्धव ठाकरेंसमोर नवं संकट, मुख्यमंत्रिपद धोक्यात?

कोरोनाचं संकट थैमान घालत असताना उद्धव ठाकरेंसमोर नवं संकट, मुख्यमंत्रिपद धोक्यात?

एकीकडे कोरोनाचं संकट सुरू असतानाच उद्धव ठाकरेंसमोर थेट मुख्यमंत्रिपद जाण्याचाच धोका निर्माण झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : जगभरातील देशांना चिंतेत टाकणाऱ्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रालाही धडक दिली आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लोकांसमोर वारंवार संयमाचं आवाहन करत आहेत आणि कठोर निर्णयही घेत आहेत. मात्र एकीकडे हे संकट सुरू असतानाच उद्धव ठाकरेंसमोर थेट मुख्यमंत्रिपद जाण्याचाच धोका निर्माण झाला आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला. येत्या 24 एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या 9 जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीची तारीख नंतर जाहीर करणार आहे. या स्थितीमुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे. कारण उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. असं असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

कोणत्याही सभागृहाचं सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर 6 महिने राहता येतं. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 28 मे रोजी 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे. कारण निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर निवडणूक जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- नोटांवर थुंकण्याऱ्या विकृतांवर उद्धव ठाकरे संतापले, कडक शब्दांत दिला इशारा

दरम्यान, याआधी दीपक सावंत आणि फौजिया खान या विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतरही पुढील 6 महिने मंत्रिपदावर कायम राहिल्या होत्या. पण हे दोघेही आधी सभागृहाचे सदस्य असल्याने त्यांना कार्यकाळ वाढवून मिळाला होता. मात्र उद्धव ठाकरे हे कधीही कोणत्याच सभागृहाचे सदस्य राहिले नसल्याने पेच निर्माण झाला आहे.

First Published: Apr 4, 2020 03:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading