मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मेकअप'मुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अडचणीत, आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार!

'मेकअप'मुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे अडचणीत, आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार!

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यात अगदी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यात अगदी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यात अगदी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.

  • Published by:  Akshay Shitole
सागर सुरवसे, प्रतिनिधी सोलापूर, 21 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यात अगदी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांची प्रणिती यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी मतदारांना मेकअप बॉक्स गिफ्ट म्हणून वाटले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार नरसय्या यांच्याकडून करण्यात आली आहे. आडम मास्तरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर आता प्रणिती शिंदे यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक आयोगानं महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. यासोबतच आयोगानं 64 जागांवर पोटनिवडणुकांसाठीही सूचना जारी केल्या आहेत. या दरम्यान, निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका आणि पोटनिवडणुकांसाठी प्लास्टिकच्या वापर टाळण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी प्लास्टिक वापरासंदर्भात विशेष निर्देश जारी केले आहेत. राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करावा, असं आवाहन सुनील अरोरा यांनी केलं आहे. इतर बातम्या - निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का, काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या वेळी एक नवा नियम राजकीय पक्षांसाठी जारी केला होता. तो विधानसभा निवडणुकीतही लागू होणार आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांचा जाहिरनामा प्रत्यक्ष मतदानाच्या 48 तास आधी मांडता येणार नाही. मतदानापूर्वी काही तास अगोदर प्रचार थंडावतो. मतदारांवर कुठल्याही प्रकारचा दबाव असू नये यासाठी हा नियम गेल्या काही निवडणुकांदरम्यान पाळण्यात येत आहे. याच नियमाचा एक भाग म्हणून कुठल्याही टप्प्यात निवडणूक असली, तरी त्याच्या आधी 48 तास राजकीय पक्षांनी जाहीरनामे सादर करू नयेत, अशा अर्थाचं पत्र निवडणूक आयोगाने शनिवारी सगळ्या पक्षांना पाठवलं. पूर्वीच्याच नियमाचा हा भाग आहे, हे स्पष्ट करत आयोगाने अशा प्रकारे आश्वासनं देणारे जाहीरनामे प्रचाराचा काळ संपल्यानंतर जाहीर करू नयेत, असं सांगितलं आहे. हा आचारसंहितेचाच एक भाग आहे. इतर बातम्या - मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, महिंद्रा पिकअप आणि कारची धडक आचारसंहिता लागू झाली म्हणजे आता सरकारी कामं बंद होणार, असा समज सर्वसामान्यांचा असतो. पण नक्की काय करण्यावर बंदी आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. नाहीतर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागेल. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही ही 10 कामं सुरूच राहणार 1. पेंशनचं काम 2. आधारकार्ड बनवणं 3. जाती प्रमाण पत्र बनवणं 4. वीज आणि पाण्यासंबंधी काम 5. साफसफाई संबंधी काम 6. वैद्यकीय उपचारासंबंधी मदत घेणं इतर बातम्या - दारूच्या नशेत वॉर्ड बॉय आरोग्य मंत्र्यांच्या पडला पाया, आशीर्वाद म्हणून मिळालं.. 7. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 8. सुरू असलेला प्रकल्पही थांबणार नाही 9. आचारसंहितेचं कारण पुढे करून अधिकारी तुमची ही कामं टाळू शकणार नाहीत 10. ज्या लोकांनी घराच्या आराखड्यासाठी आवेदन दिलंय, त्यांचे आराखडे पास होतील. पण नवीन आवेदनं स्वीकारली जाणार नाहीत. VIDEO : सातारा पोटनिवडणूक होणार नाही, उदयनराजेंबद्दल भाजपची पहिली प्रतिक्रिया
First published:

Tags: Congress, Election Memories, Maharashtra Assembly Election 2019, Praniti shinde, Solapur news, Solapur S13p42

पुढील बातम्या