मुंबई, 2 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारकडून विमान प्रवासासाठी नियमावली जारी करण्यात आली होती. या दरम्यान राज्याकडून जारी करण्यात आलेल्या नियमावलीवर केंद्र सरकारने आक्षेप घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या नियमावलीत (Guideline) बदल केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) केंद्र सरकारच्या सुचना लक्षात घेऊन नवी नियमावली जारी केली. यामध्ये आंतरराष्ट्रीय (International) आणि देशांतर्गत (Domestic) विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लागू केलेले सगळे नियम मागे घेण्यात आले आहेत. साऊथ आफ्रिका, झिंबाब्वे आणि बोत्स्वाना या हाय रिस्क असणाऱ्या देशांसाठीच हे नियम लागू असतील, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच केंद्र सरकारने वेळोवेळी लागू केलेले आदेशच अंतिम आदेश ग्राह्य धरले जातील, असंदेखील स्पष्ट करण्यात आलं आहे.
दक्षिण अफ्रिका, बोस्वाना आणि झिब्बाब्वे
#Omicron | Govt of Maharashtra revises its guidelines for passengers arriving in the state
In the case of domestic air travel, Passengers will either have to be fully vaccinated or compulsorily carry RT-PCR Test certificate showing negative result within 72 hours before boarding pic.twitter.com/svHb56CHe8 — ANI (@ANI) December 2, 2021
हाय रिस्क देशांमध्ये गेल्या 15 दिवसात प्रवास केलेले लोक हे हाय रिस्क प्रवासी मानले जातील.
हाय रिस्क देशातून येणारे प्रवासी हेच हाय रिस्कर प्रवासी.
हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांना RTPCR टेस्ट बंधनकारक
या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन राहावं लागणार. या प्रवाशांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना रुग्णालयात दाखल केलं जाईल.
प्रवाशांची 7 दिवसानंतर पुन्हा टेस्ट होणार. टेस्ट निगेटिव्ह आली तर 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार.
इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी लसीचे दोन डोस अनिवार्य
लस घेतली नसेल तर 72 तासांचा RTPCR टेस्ट
राज्य सरकारने याआधी हाय रिस्क कंट्रीज यादीत 12 देशांचा उल्लेख केला होता. मात्र केंद्राच्या आक्षेपानंतर आता 12 ऐवजी 3 देशांचाच हाय रिस्क कंट्रीज समावेश करण्यात आला आहे.
देशांतर्गत विमान प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठी नियमांत शिथीलता देण्यात आली आहे.
याआधी दुसऱ्या राज्यांतून येणाऱ्यांकरता कोविड निगेटीव्ह टेस्ट बंधनकारक होती. आता लसीकरणाचे प्रमाणपत्र असेल तरी चालेल.
मात्र, हाय रिस्क कंट्री मधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता 7 दिवस संस्थात्मक कक्वारंटाईनमध्ये राहण्याचा नियम कायम आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.