मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनंजय मुंडे प्रकरणी तिसरा धक्का: 'तिने मलाही ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला'; भाजपनंतर मनसे नेत्याचाही धक्कादायक खुलासा

धनंजय मुंडे प्रकरणी तिसरा धक्का: 'तिने मलाही ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न केला'; भाजपनंतर मनसे नेत्याचाही धक्कादायक खुलासा

'माझा 2008-09 मध्ये धनंजय मुंडे झाला असता',  असं म्हणत मनसे नेते मनीष धुरी यांनी तिसरा धक्का दिला आहे आणि त्या महिलेने आपल्यालाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे.

'माझा 2008-09 मध्ये धनंजय मुंडे झाला असता', असं म्हणत मनसे नेते मनीष धुरी यांनी तिसरा धक्का दिला आहे आणि त्या महिलेने आपल्यालाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे.

'माझा 2008-09 मध्ये धनंजय मुंडे झाला असता', असं म्हणत मनसे नेते मनीष धुरी यांनी तिसरा धक्का दिला आहे आणि त्या महिलेने आपल्यालाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं आहे.

मुंबई, 14 जानेवारी: धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या संदर्भात आणखीही काही राजकीय नेत्यांनी तक्रारी करायला सुरुवात केली आहे. मुंडे यांनी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. आपले त्या महिलेबरोबर संमतीने संबंध असल्याचं त्यांनी कबूल केल्यानंतर खळबळ उडाली. मात्र आता रेणू शर्मा या आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनीही तक्रार नोंदवली आहे. त्यापाठोपाठ मनसे नेते मनीष धुरी यांनीही एक जबरदस्त खुलासा केला आहे. दहा वर्षांपूर्वी माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्माने 2008-09 मध्ये मलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनीष धुरी यांनी केला आहे. 'मी यातून वाचलो. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीने मलाही फसवायचा प्रयत्न केला होता. त्यांचं कुटुंबच अशा प्रकारे उच्चभ्रू व्यक्तींना आणि राजकारण्यांना जाळ्यात ओढतात आणि ब्लॅकमेलिंग करतात,' असं धुरी म्हणाले. Tv9 ने ही बातमी दिली आहे.

मनीष धुरी मनसे नेते आहेत. मुंबईत अंधेरी (पश्चिम) मतदारसंघात ते पक्षाचे विभाग अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.  विवाहबाह्य संबंधांची जाहीर कबुली दिल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत आणि त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाव वाढत आहे. एकीकडे यासंदर्भात राष्ट्रवादीची पक्षांतर्गत  बैठक सुरू असली, तरी दुसरीकडे भाजपच्या एका नेत्याचं एक पत्र मुंडेंच्या मदतीला धावून आलं आणि आता यासंबंधी तिसरा धक्कादायक खुलासा झाला आहे.

कृष्णा हेगडे हे माजी आमदार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. ते काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षात सामील झाले. त्यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या एका पत्रात रेणू शर्मा नावाच्या महिलेवर ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत. हीच महिला धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप करत होती. अंधेरीच्या अंबोली पोलीस स्टेशनमध्ये कृष्णा हेगडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची प्रत News18 lokmat ला मिळाली आहे. त्यानुसार त्यांनी रेणू शर्मा आपल्यालाही सतत फोन आणि मेसेज करून तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती, असं म्हटलं आहे. 'रेणू शर्मा नावाची महिला मला 2010 पासून सतत फोन करून आणि मेसेज करून तिच्याशी संबंध ठेवावेत अशी गळ घालत होती. माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती अशा प्रकारे जाळं टाकून त्यात भुलवून  ब्लॅकमेल करते आणि पैसे लुबाडते. मी तिच्यापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो. तिला एकदाही भेटलो नाही. दोन दिवसांपूर्वी तिने धनंजय मुंडेंवर आरोप केलेले पाहिले आणि मी पोलिसांना ही माहिती देण्यासाठी पुढे आलो', असं हेगडे यांनी म्हटलं आहे. कोण आहेत रेणू शर्मा? महाराष्ट्र सरकारमधील धनंजय मुंडे या बड्या नेत्यावर आरोप करणाऱ्या रेणू अशोक शर्मा या बॉलिवूड गायिका आहेत. रेणू शर्मा यांनी दावा केला आहे की, 1997 मध्ये त्यांची आणि धनंजय मुंडेंची भेट झाली. तेव्हा त्या 16-17 वर्षांच्या होत्या. मध्यप्रदेशात त्यांच्या बहिणीच्या घरी त्यांची भेट झाली होती. 2006 मध्ये त्यांची बहिण इंदोरमध्ये असताना मुंडे यांनी इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला आहे. बड्या निर्मात्याला भेटवण्याच्या आणि बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या नावाखाली त्यांनी वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप रेणू यांनी केला आहे. धनंजय मुंडेंनी फेटाळले सर्व आरोप या सगळ्या आरोपांवर स्वत: धनंजय मुंडे यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो, असं मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र यावेळी त्यांनी बलात्काराचे आरोप खोडून काढले आहेत. '2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता,' असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमधून केली आहे.
First published:

पुढील बातम्या