मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अखेर विवाहित मुलीच्या प्रेमापुढे झुकलं कुटुंब; 3 महिन्यांच्या दुराव्यानंतर Love स्टोरीचा शेवट गोड

अखेर विवाहित मुलीच्या प्रेमापुढे झुकलं कुटुंब; 3 महिन्यांच्या दुराव्यानंतर Love स्टोरीचा शेवट गोड

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

अगदी हिंदी चित्रपटाला शोभावी अशी एक घटना चंद्रपूरात घडली आहे. येथील एका तरुणीनं लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराच्या घरी आली आहे.

  • Published by:  News18 Desk

चंद्रपूर, 14 सप्टेंबर: अगदी हिंदी चित्रपटाला शोभावी अशी एक घटना चंद्रपूरात घडली आहे. येथील एका तरुणीनं लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनी पतीचं घर सोडून थेट प्रियकराच्या घरी आली आहे. त्यानंतर मुलीच्या प्रेमापुढे तिच्या कुटुंबीयांनी देखील हात टेकले आणि शेवटी तिचा विवाह प्रियकराशी लावून दिला आहे. रविवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनं संबंधित प्रेमीयुगुलांचा आंतरजातीय विवाह लावण्यात आला आहे. हनुमान मंदिरात पार पडलेल्या या विवाहात गावातील अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती.

संबंधित घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील बोथली गावातील आहे. तर महेश श्रीराम नागपुरे आणि शिवानी दिनकर सुकारे अशी विवाहबंधनात अडकलेल्या प्रेमीयुगालांची नावं आहे. मागील दोन वर्षांपासून महेश आणि शिवानी एकमेकांशी प्रेम करत होते. पण दोघंही वेगवेगळ्या जातीचे असल्यानं दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. शिवानीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रेमाला विरोध करत जबरदस्तीनं तिचा एका वेगळ्याच तरुणाशी विवाह लावून दिला होता. पण हे लग्न मनाविरुद्ध झाल्यानं शिवानीनं लग्नाच्या तीन महिन्यांनंतर भलतंच पाऊल उचललं आहे.

हेही वाचा-...म्हणून पोलीस पती करायचा पत्नीचा छळ; विवाहितेनं गौरी आगमनाच्या दिवशीच दिला जीव

नेमकं काय घडलं?

लग्न झाल्यानंतर तीन महिन्यांनी शिवानीनं आपल्या नवऱ्याचं घर सोडून थेट प्रियकर महेशच्या घरी आली आहे. याठिकाणी आल्यानंतर तिने सर्व प्रकार महेशच्या घरच्यांना सांगितला. तसेच आता मी या घरातून परत जाणार नाही, माझं जे काही व्हायचं आहे, ते याच घरात होईल, अशी थेट भूमिका शिवानीनं घेतली होती. हा प्रकार घडल्यानंतर याची माहिती शिवानीच्या कुटुंबीयांना देखील देण्यात आली. दोन्ही कुटुंबीयांनी तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण शिवानीनं कोणाचंही ऐकलं नाही.

हेही वाचा-मुलाच्या नोकरीसाठी पतीची फिल्मी स्टाइलने हत्या; महिलेनं BFच्या मदतीनं घडवला थरार

अखेर शिवानीच्या प्रेमापुढे दोन्ही कुटुंबीयांना हात टेकावे लागले. त्यानंतर रविवारी चिमूर तालुक्यातील बोथली गावात एक अनोखा विवाह पार पडला आहे. येथील एका हनुमान मंदिरात दोघं प्रेमीयुगुल विवाहबंधनात अडकले आहेत.

First published:

Tags: Chandrapur