मुंबई, 19 मे : राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. त्याच पार्श्वभूमिवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 23 मे नंतर राज्यात दुष्काळ करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री हा दौरा करणार असल्याची माहिती सुत्रांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिली आहे. महसूल विभाग निहाय मुख्यमंत्री हा दौरा करणार आहेत. राज्यात यंदा भयंकर अशी परिस्थिती आहे. पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जनावरं देखील चारा छावण्यांमध्ये बांधण्यात आली आहेत. सरकारनं डिसेंबरमध्येच दुष्काळ जाहीर केला असला तरी लोकांमध्ये मात्र सरकारनं केलेल्या उपाययोजनांबद्दल समाधान दिसत नाही. पावसाळा तोंडावर आला असल्यानं यंदा वरूण राजाच्या कृपादृष्टीवर सर्व काही अवलंबून आहे.
शरद पवारांनी केला दौरा
राज्यातील निवडणुका संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. यावेळी ते सारी परिस्थिती जाणून घेत आहेत. लोकांना आपण सरकारशी बोलू तुमच्या समस्या सांगा अशा शब्दात आधार देताना दिसत आहेत.
भयंकर स्थिती
यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षा देखील भयंकर असल्याचं जणकार सांगतात. धरणांमधील पाणीसाठी देखील संपला असून सारी मदार ही टँकरवर आहे. काही ठिकाणी तर दावणीची जनावरं खाटीलाका देण्याची वेळ आली आहे. शेतकरी आत्महत्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांनी दाव सोडून आता शहरांची वाट धरली आहे. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं गावांमधील स्थलांतर आता दिवसेंदिवस वाढत आहे. शहरांना देखील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमी शिल्लक राहिला आहे.
VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या