'या' महिन्यापासून सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकते कोरोना लस, छगन भुजबळांची माहिती

'या' महिन्यापासून सर्वसामान्यांना उपलब्ध होऊ शकते कोरोना लस, छगन भुजबळांची माहिती

देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.

  • Share this:

नाशिक, 13 फेब्रुवारी : देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आता 10 मार्च नंतर, सर्वसामान्य नागरिकांसाठी लस उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना दिली आहे. तसंच आतापर्यंत 81  टक्के लसीकरण झालं असल्याचंही ते म्हणाले. 36 हजार लोकांचं लसीकरण होणं अपेक्षित होतं. त्यापैकी 29 हजार लोकांचं लसीकरण झालं आहे. लस घेतल्याने कोणतेही साईड इफेक्ट्स होत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण अभियान सुरू करण्यात आलं. देशात आतापर्यंत 50 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात देशातील सरकारी आणि प्रायव्हेट रुग्णालयातील तीन कोटी हेल्थकेअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिली जात आहे.

(वाचा - भिवंडीतील गांजा रॅकेटचा पर्दाफाश; मुंबईच्या गुन्हे शाखा विभागाची धडक कारवाई)

पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस दिला जाईल. लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर, दोन आठवड्यांनी कोरोनाविरोधात अँटीबॉडी विकसित होतील. तसंच, कोरोना लसीकरणानंतरही कोविड नियमांचं पालन करणं अनिवार्य असल्याचं विशेषज्ञांनी सांगितलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: February 13, 2021, 2:14 PM IST

ताज्या बातम्या