नागपूरच्या दसरा महोत्सवाला अडवाणी लावणार हजेरी

सध्या भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेले अडवाणी बऱ्याच कालावधीनंतर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

सध्या भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेले अडवाणी बऱ्याच कालावधीनंतर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

  • Share this:
नागपूर, 28 सप्टेंबर: ३० सप्टेंबरला म्हणजे दसऱ्याला रेशीमबाग मैदानात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सवाला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी उपस्थित राहणार आहेत. सध्या भाजपच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेले अडवाणी बऱ्याच कालावधीनंतर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. सध्या नागपुराच संघ स्वयंसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आहे. या कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी आडवाणी दिल्लीहून रात्री ९.३० वाजता नागपूरला पोहोचतील. त्यानंतर वर्धमाननगर येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे. सकाळी विजयादशमी सोहळ्याला उपस्थित राहून दुपारी १४.४० वाजता ते परत दिल्लीकडे रवाना होतील. या उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी हेदेखील उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. भाजपतर्फे नरेंद्र मोदी यांची निवडणूक प्रचार प्रमुखपदी झालेल्या निवडीनंतर नाराज झालेल्या अडवाणींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ५ जुलै २०१३ रोजी त्यांनी नागपुरात येऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अडवाणी यांची ही पहिलीच नागपूर भेट ठरणार आहे. विजयादशमी उत्सवानंतर अडवाणी रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊ शकतात, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.​
First published: