कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण

कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी दोषी आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण

नितीन भैलूमे याचे वकील प्रकाश आहेर आज युक्तिवाद करणार आहेत. 11 वाजता युक्तिवाद सुरू होणार आहे.अहमदनगरच्या सत्र न्यायालयात आज अहेर शिक्षेवर युक्तीवाद करतील

  • Share this:

अहमदनगर,21 नोव्हेंबर: राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणीतील दोषींच्या शिक्षेवर आज जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाला.दोषीच्या वकिलांनी आज आपल्या अशिलाला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी अशी कोर्टात मागणी केली. या प्रकरणातील मुख्य दोषी आरोपी असलेल्या जितेंद्र शिंदेंने फाशी ऐवजी जन्मठेप किंवा कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केलीय.

तर दुसरीकडे  या खटल्यातील तीन नंबरचा आरोपी नितीन भैलुमेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला या खटल्यात गोवल्याचा दावा केलाय.

जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी सिद्ध केलंय.  बलात्कार, खून, गुन्हेगारी कट रचणे आणि अन्य गुन्हे  दोषींवर सिद्ध झाले आहेत. या खटल्यात वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले, असा निर्वाळा कोर्टानं दिला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारची बाजू मांडली.

13 जुलै 2016 रोजी नगरच्या कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिन्ही दोषींनी बलात्कार केला, त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीनं तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.

 

कोपर्डीचा घटनाक्रम

13 जुलै 2016 - नववीत शिकणाऱ्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या

14 जुलै 2016 - गावातील आरोपी जितेंद्र शिंदेला अटक

16 जुलै 2016 - संतोष भवाळ, नितीन भैलुमेला अटक

7 ऑक्टो. 2016 - न्यायालयात आरोपपत्र दाखल

20 डिसें. 2016 - पहिला साक्षीदार तपासला

24 मे 2017 - शेवटचा साक्षीदार तपासला

4 सप्टें. 2017 - बचाव पक्षाकडून एक साक्षीदार नोंदवला

26 ऑक्टो. 2017 - अंतिम युक्तिवादाला सुरुवात

8 नोव्हें. 2017 - अंतिम युक्तिवाद पूर्ण

18 नोव्हेंबर - तिन्ही आरोपींना दोषी करार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2017 08:37 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading