डर के आगे जीत है !, काळजाचा ठोका चुकवणारा हायलाइनिंग

डर के आगे जीत है !, काळजाचा ठोका चुकवणारा हायलाइनिंग

लोणावळ्यातील नागफणी कडा इथं जागतिक विक्रमासाठी सराव सुरू आहे. त्यासाठी विदेशातून खेळाडू आले आहे. धाडसी आणि साहसी असलेल्या हायलाइनिंग उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवताहेत

  • Share this:

लोणावळा, 19 जानेवारी: लोणावळ्यातील नागफणी कडा इथं जागतिक विक्रमासाठी सराव सुरू आहे. त्यासाठी विदेशातून खेळाडू आले आहे. धाडसी आणि साहसी असलेल्या हायलाइनिंग उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवताहेत. आंतरराष्ट्रीय हायलायनर लोणावळ्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगात कसून सरावा करताहेत. यात गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 5 वेळा नोंद असलेला लूकस एमलर फ्रिडी क्युनहो यासारख्या उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश आहे.

कसा असतो हायलाइनिंग खेळ?

हायलाइनिंगचा खेळ अतिशय थरारक असतो. या खेळामुळं पाहाणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. उंच डोंगराच्या एका कड्यावरून विरुद्ध बाजूस असलेल्या दुसरा डोंगर कड्याला नायलॉनची दोरी घट्ट बांधली जाते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येतात. खेळाडूला सेफ्टी बेल्ट लावला जातो. तसेच कॅमेऱ्यालाही सेफ्टी बेल्ट बांधला जातो. हायलायनर एका डोंगराच्या टोकाला बांधलेली दोरी चालून पार करून दुसऱ्या डोंगराचा टोक गाठतो. खाली शेकडो फूट खोल दर तर डोक्यावर निरभ्र आकाश दिसतं. दोरीवरून चालण्याच्या या साहसी आणि धाडसी खेळाला हायलायनिंगचा खेळ म्हणतात. हवेचा वेग तसेच निरभ्र वातावरणावर हा खेळ अवलंबून असतो. हाय लाइनिंग तसेच स्लॅप लाइनिंग अशा दोन प्रकारांमध्ये हा खेळ खेळला जातो.

जगभरात खेळला जातो हायलाइनिंगचा खेळ

जगभरात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अनेक खेळाडूंनी या खेळाच्या माध्यमातून आपल्या नावावर विश्वविक्रमची नोंद केली आहे. जर्मनीहून लोणावळ्यातील सह्याद्रीच्या डोंगरात हा खेळ खेळण्यासाठी दिग्गज आले आहेत. यात  लूकस एमलर ,फ्रिडी क्यूनहे ,मझोची शिजारे यांच्या नावावर दोरीवरून चालण्याचे अनेक विक्रम आहे.

जागतिक विक्रम मोडण्यासाठी लोणावळ्यात सराव

जर्मनीहून आलेला लूकस हा आपलाच जागतिक विक्रम मोडण्यासाठी लोणावळ्यातील सह्याद्रीच्या डोंगरावर हायलाईनचा सराव करतोय. शेकडो फूट उंच असलेल्या दोरीवरून तो आणि त्याची टीम हायलाईनिंगचा सराव करताहेत. त्यांच्याबरोबर इतर अनेक खेळाडून हे हायलाईनिंगचा सराव करताहेत. भारतात प्रथमच लोणावळ्यातून हायलाईनिगंच्या खेळाला सुरवात झाली आहे. शिवदुर्ग ट्रेकर्सचा सदस्य रोहित वर्तक याने या खेळाचे आयोजन केलं आहे.

या खेळासाठी लागणारे साहित्य सहसा भारतात उपलब्ध होत नाही. हा धाडसी खेळ भारतात प्रचलित होण्यास अनेक अडचणी आहेत. त्यामुळे अनेक उमद्या खेळाडूंनी या खेळाकडे पाठ फिरवल्याचं आयोजकानं सांगितलं आहे.

4 दिवसांपासून चित्तथरारक खेळ

मागील ४ दिवसापासून लोणावळ्यातील कुरवंडे गावात चित्तथरारक खेळ सुरू आहे. शेकडो फूट उंचावरून दोरीवरून चालणारे खेळाडू पाहण्यासाठी आता ग्रामस्थ गर्दी करताहेत. तसेच या खेळाविषयी तरुण माहिती घेताहेत.

भारत देशात हायलाईनिग या खेळाचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात व्हावा आणि उत्कृष्ट दर्जाचे हायलायनर भारत तयार व्हावेत अशी इच्छा परदेशातून आलेल्या खेळाडूंनी व्यक्त केली आहे.

 

First published: January 19, 2020, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading