मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जालन्यात पुजाऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, अश्लील VIDEO ही केला शूट

जालन्यात पुजाऱ्यानं दत्तक घेतलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, अश्लील VIDEO ही केला शूट

दोन तरुणांनी एका अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

दोन तरुणांनी एका अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

Rape in Jalna: जालन्यात एका अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Adopted Minor Girl Gang Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

जालना, 14 ऑगस्ट: जालना (Jalna) जिल्ह्यातील बदनापूर येथील कंडारी खुर्द गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील दोन तरुणांनी एका अनाथ अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Adopted Minor Girl Gang Rape) केला आहे. नराधम आरोपींनी पीडित मुलीला बाजूच्या एका शेतात फरफटत नेवून तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केला आहे. शिवाय घटनेची वाच्यता केल्यास बदनाम करण्याच्या हेतूनं आरोपींनी बलात्काराचा व्हिडीओ देखील शूट (Shoot Obscene Video) केला आहे. पण पीडित मुलीची अवस्था पाहून घडलेला प्रकार गावकऱ्यांना समजला आहे. ही घटना समोर येताच गावात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही नराधम तरुणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपींकडून त्यांचा  मोबाइल जप्त केला आहे. सोपान ढाकणे आणि शंभू ढाकणे असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी अनाथ असून तिला गावातील एका पुजाऱ्यानं दत्तक घेतलं आहे.

हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून युवकाचा प्रताप; गावभर लावले विद्यार्थीनीचे पोस्टर अन्...

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास पीडित मुलगी एकटी लक्ष्मणनगर तांडा गावाकडे चालत चालली होती. तेव्हा आरोपी सोपान आणि शंभू यांची नजर तिच्यावर पडली. यानंतर आरोपींनी पीडितेचा रस्ता आडवला आणि तिला फरफटत शेजारच्या शेतात नेलं. याठिकाणी आरोपींनी पीडितेचं तोंड दाबून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच या घटनेचा व्हिडीओही शूट केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करू अशी धमकीही नराधमांनी दिली.

हेही वाचा- 6 सुना करूनही नाही मिळाला वंशाचा दिवा; भाच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणात नवा खुलासा

पण पीडित अल्पवयीन मुलगी रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर गावातील लोकांना संपूर्ण प्रकार लक्षात आला. यानंतर गावातील काहींनी याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव, दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून त्यांचा मोबाईलही जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Gang Rape, Rape on minor