Home /News /maharashtra /

RBI ची कारवाई, बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक, पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीयांना धक्का

RBI ची कारवाई, बीडच्या द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक, पंकजा मुंडेंच्या निकटवर्तीयांना धक्का

 बीडच्या (beed) सहकार क्षेत्रातील दिग्गज द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर ( Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank ) प्रशासकाची (administrator ) नियुक्त केल्याने बीडच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली.

बीड, 25 सप्टेंबर : बीडच्या (beed) सहकार क्षेत्रातील दिग्गज द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर ( Dwarkadas Mantri Nagari Sahakari Bank ) प्रशासकाची (administrator ) नियुक्त केल्याने बीडच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सहकार क्षेत्रातील नामांकित सुभाष सारडा (subhash sarada) यांच्या ताब्यात ही बँक होती. सुभाष सारडा हे भाजपचे नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांचे निकटवर्तीय असून त्यांचा मुलगा आदित्य सारडा हे पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील बीड जिल्हा बँकेचे चेअरमन होते. यामुळे सहकारासह राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून रिझर्व बँकेने ही कारवाई केली आहे. प्रशासकीय कामकाजातील व व्यवहारातील अनियमितता व बँकेसंदर्भात अनेक तक्रारी स्टटयुटरी ऑडिटमध्ये आढळल्यामुळे अनेक ताशेरे ओढण्यात आले होते. त्यामुळे सरत शेवटी रिझर्व्ह बँकेने (rbi) प्रशासकी नियुक्तीची कारवाई केली आहे. बँकेवर प्रशासक नियुक्त केल्याने ठेवीदारांमध्ये मध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, भाजप खासदारासह अनेक जखमी बँकेची उलाढाल ही हजार कोटीच्या वर आहे. ठेवीदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. रिझर्व बँकेच्या सूचनेनुसार, सहकार आयुक्त यांच्या आदेशाने बीडचे जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांनी मंत्री बँकेच्या प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. 2019-20 व्या वर्षात बँकेच्या प्रशासकीय कामकाजातील अनियमितता यामुळे रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनेनुसार, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्यात आलेला असून अनियमितता व इतर त्रुटी काय आहे. त्याची पूर्तता बँकेच्या व्यवहारातील अनियमितता तपासली जाईल. ठेवीदारांनी काळजी करू नये बँकेची परिस्थिती उत्तम आहे लवकरच बँका पूर्ववत होईल, असं प्रशासक विश्वास देशमुख यांनी सांगितलं. Maharashtra Unlock : प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? मात्र, जिल्ह्याच्या सहकारातील महत्त्वाची दुवा समजली जाणारी द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँक या बँकेवर प्रशासक नियुक्त झाल्यामुळे हजारो ठेवीदारांनी मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बँकेच्या कामकाजात अशी कोणती अनियमितता झाली. याबरोबरच कर्ज वाटप व इतर ठेवींच्या संदर्भात काय अडचणी आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात असून ज्यांच्या ताब्यात बँक आहे, असं सुभाष सारडा यांच्या गटामध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या