प्रशासनाचा हलगर्जीपणा! जळगाव कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रशासनाचा हलगर्जीपणा! जळगाव कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

यापूर्वीही या कोविड सेंटरमधून कोरोना रुग्ण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले होते

  • Share this:

राजेश भागवत/ जळगाव, 11 ऑगस्ट : अमळनेर येथील कोविड सेंटर मधून पुन्हा एक तरुण रुग्ण बेपत्ता झाला असून त्याचा मृतदेह नगरपालिकेसमोरील रस्त्यावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करीत या दुसर्‍या घटनेत पॉझिटिव्ह रुग्णाचा बळी गेल्याने यंत्रणेवर टीकेची झोड उठत आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत तातडीने अहवाल मागवल्याची माहिती समोर आली आहे.

वावडे येथील सुनील दिलभर पाटील (वय 32) हा तरुण आरोग्य विभागाने आयोजित शिबिरात स्वॅब घेतल्यानंतर पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. रुग्णवाहिकेने 9 तारखेला त्याला प्रताप महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरला दाखल करण्यात आले होते. तेथे त्याला श्वसनाचा त्रास होत होता त्यात त्याच्या हाताला जखम असल्याने अधिकाऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कक्षात उपचारासाठी हलवले होते.

हे वाचा-काँग्रेसच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

काल सकाळी सुनील पाटील ग्रामीण रुग्णालयात दिसून आला नाही म्हणून कर्मचारी व डॉक्टरांनी त्याचा शोध सुरू केला. तो आढळून आला नाही म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला जाऊन रुग्ण सुनील विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला पळून गेल्याचा गुन्हा दाखल केला होता. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास सुनीलचा मृतदेह नगर पालिकेसमोर रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्यानंतर रूग्णवाहिकेने ताबडतोब मृतदेह हलवून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. नगरपालिका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह सापडलेली जागा सॅनिटाईज केली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 11, 2020, 7:14 PM IST

ताज्या बातम्या