मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून 'नमस्ते संभाजीनगर' बॅनरबाजी

आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून 'नमस्ते संभाजीनगर' बॅनरबाजी

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे.

औरंगाबाद, 16  जानेवारी : औरंगाबाद (AURANGABAD)शहराच्या नामकरणाचा मुद्यावरून राजकारण पेटले आहे. आता या वादात भाजप युवा मोर्चाने  (BJP Youth Front) उडी घेतली आहे. शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  (Aditya Thackery) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 'नमस्ते संभाजीनगर'चे बॅनर झळकावले आहे.

संभाजीनगर नामकरणाच्या वादात आता भाजप युवा मोर्चाने उडी घेतली आहे. शुक्रवारी रात्री युवा मोर्चाने शहरात 'लव्ह औरंगाबाद' बोर्डाच्या समोर 'नमस्ते संभाजीनगर'चे फ्लेक्स लावली आहेत. सर्वात आधी सेनेच्या वतीने सुपर संभाजी नगर बोर्डे लावण्यात आले. त्यात उडी घेत मनसे ही संभाजी नगर बोर्ड शहरात लावले होते.

या बॅनरबाजीच्या खेळात शहरातीळ राजकीय वातावरण तापले होते आता भाजप युवा मोर्चाने बॅनरबाजी केल्यामुळे यात भर पडली आहे. विशेष म्हणजे आज औरंगाबादमध्ये आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरबाजीमुळे शहरातले राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

मध्यंतरी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब सेक्लुर नव्हता, असं म्हणत काँग्रेसला टोला लगावला होता. त्यानंतर या वादावर पडदा पडला होता.

विशेष म्हणजे, औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव हा महाविकास आघाडी सरकारने मंजूर केला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. पण, त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. त्यामुळे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी  औरंगाबाद शहराच्या नामाकरणाच्या मुद्यावरून भाजपला खडेबोल सुनावले होते.

First published: