मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विधान परिषदेच्या निकालावरून आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटाला चॅलेंज, म्हणाले हिंमत असेल तर...

विधान परिषदेच्या निकालावरून आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटाला चॅलेंज, म्हणाले हिंमत असेल तर...

आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे

आज विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 फेब्रुवारी : आज शिक्षक आणि पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. नागपूरमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपुरात सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तर औरंगाबादमध्ये देखील महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मात्र कोकणात भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने मविआला धक्का दिला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

विधान परिषद निवडणूक निकालावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. निवडणूक असते हार जीत सुरूच राहाते. पण हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिका निवडणुका घेऊन दाखवा. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घेऊन दाखवा असं थेट चॅलेंजच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला दिलं आहे.

हेही वाचा : Nagpur MLC Election : भाजपच्या बालेकिल्ल्याला मविआचा हादरा; नागपुरातून सुधाकर आडबाले विजयी

भाजपला टोला 

दरम्यान यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपला देखील टोला लगावला आहे. आपल्या देशात, आपल्या राज्यात आणि आपल्या मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही असा विचार आता मनात येतो. राज्यात देखील हेच सुरू आहे. आपली मुंबई जगभरात ओळखली जाते.  मुंबईकर म्हणून आपली ओळख आहे. मात्र त्याच मुंबईमध्ये गेल्या एक वर्षापासून कोणाचीही सत्ता नाहीये, प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक अंदाधूंद कारभार करत आहेत, जनतेच्या पैशांचा चुरडा होत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

First published: