आदित्य ठाकरेंचीही विधानसभेच्या मैदानात एण्ट्री, मुंबईतील मतदारसंघाची पाहणी?

आदित्य ठाकरेंचीही विधानसभेच्या मैदानात एण्ट्री, मुंबईतील मतदारसंघाची पाहणी?

शिवसेनेच्या 53 वर्षांच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील एकही सदस्याने निवडणूक लढलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 20 जून : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेला बळ मिळालं आहे. कारण आदित्य ठाकरे यांनी लालबागच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघाची पाहणी केली असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या 53 वर्षांच्या इतिहासात ठाकरे घराण्यातील एकही सदस्याने निवडणूक लढलेली नाही. पण आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरतील, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मुंबईतील शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील की नाही, याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा असेल, असे शिवसेना प्रवक्ता संजय राऊत यांनी याआधीच सांगितले आहे.

आदित्यबद्दल काय म्हणाले होते मनोहर जोशी?

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाला (13 जून) शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आदित्य यांच्याबद्दल भाष्य केलं होतं. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहायला आवडेल, असं मत मनोहर जोशी यांनी व्यक्त केलं होतं. वाढत्या वयासोबतच आदित्य यांचा अभ्यासही वाढलाय, त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे जोशी यांनी सांगितले.

VIDEO: नाशिकमध्ये गुंडगिरी, कॉलेजच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी

First published: June 20, 2019, 2:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading