आदित्य ठाकरे यांनी प्रोफाइलवरून 'मंत्री' शब्द हटवला! उलट सुलट चर्चांना उधाण

आदित्य ठाकरे यांनी प्रोफाइलवरून 'मंत्री' शब्द हटवला! उलट सुलट चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑगस्ट: राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' हा शब्द हटवला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

मात्र, दुसरीकडे, शिवसेनेने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. शिवसेनेनं याबाबत म्हटलं की, आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये 'महाराष्ट्र पर्यटन आणि पर्यावरण मंत्री' असं लिहिलंच नव्हतं असं, शिवसेनंनं म्हटलं आहे.

हेही वाचा...अजित पवार, धनंजय मुंडेंसह आणखी काही नेत्यांना पोलिसांची नोटीस

इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये 'मंत्री'

आदित्य ठाकरे यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी केवळ आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये 'मंत्री' असा उल्लेख केला होता. आदित्य ठाकरे यांनी वर्षभरापासून आपल्या ट्विटर प्रोफाइलमध्ये कोणताही बदल केला नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

सुशांतसिंह प्रकरणात आदित्य यांचं नाव?

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव वारंवार घेतलं जात आहे. विरोधी पक्ष भाजपचे नेते प्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे याचं नाव घेत नसले तरी सरकारमधील युवा मंत्री म्हणून त्यांच्याकडेच बोट दाखवलं जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे मंत्रिपदाचा राजीनामा देता की काय, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, आपला सुशांतसिंह प्रकरणाशी काही एक संबंध नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यात सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने देखील आपण आदित्य ठाकरेंना ओळखत नसल्याचं चौकशीत सांगितलं आहे.

हेही वाचा...मोठी बातमी! मुंबईतील मोहरमच्या ताझिया मिरवणुकीला हायकोर्टाची सशर्त परवानगी

आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलं नाही...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात भाजपच्या कोणत्याही नेत्याने प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाही आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र, गेली 40 दिवस जे खुलासे झाले नाहीत ते सीबीआयच्या तपासात समोर येत आहेत. मग सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांवर कुणाचा दबाव होता? याचा तपास व्हायला हवा. हार्ड डिस्क नष्ट कुणी केल्या हे देखील समोर यायला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: August 28, 2020, 8:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading