Home /News /maharashtra /

आदित्य ठाकरे भाजपच्या राजकारणाला म्हणाले Shameful; 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलनाला असं दिलं प्रत्युत्तर

आदित्य ठाकरे भाजपच्या राजकारणाला म्हणाले Shameful; 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलनाला असं दिलं प्रत्युत्तर

भाजपच्या 'महाराष्ट्र बचाओ' या सरकारविरोधी आंदोलनासंदर्भातला एक फोटो पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी Twitter वर हे लज्जास्पद आहे, असं लिहिलं आहे.

    मुंबई, 22 मे : Coronavirus चा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेत नसला, तरी अद्याप या विषयावर थंड असलेलं राजकारण मात्र आता पेटायला लागलं आहे. महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे सरकार Coronavirus ला नियंत्रित करायला अपयशी ठरत असल्याचं सांगत भाजपने शुक्रवारपासून सरकारविरोधी आंदोलनाला सुरुवात केली. 'महाराष्ट्र वाचवा' या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार असे अनेक महत्त्वाचे मंत्री सहभागी झाले आहेत. आता सत्ताधारी पक्षांकडूनही या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपला लक्ष्य केलं जात आहे. यातच चर्चा आहे आदित्य ठाकरे यांनी Twitter वरून दिलेल्या प्रत्युत्तराची. भाजपच्या या आंदोलनासंदर्भातला एक फोटो पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहिलं आहे की, अत्यंत लज्जास्पद राजकारण नेत्यांकडून केलं जात आहे. 'लहान मुलांना भर उन्हात उभं करून तोंडावरचे मास्कही खाली करायला सांगून अशा आंदोलनाचे फोटो काढणं लज्जास्पद आहे.' भाजपच्या राजकारणाला Shameful म्हणत त्यांनी या फोटोबद्दल लिहिलं आहे. Good News: पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी, गंभीर कोरोना रुग्ण झाला बरा 'लहान मुलांना घरात सुरक्षित ठेवायचं सोडून असं रस्त्यावर उभं केलं जात आहे', असं सांगत त्यांनी 'कोरोना को भूल गये, पॉलिटिक्स प्यारा है', असंही लिहिलं आहे. महाराष्ट्रातही कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असतानाच राज्यात राजकारणही पेट घेत आहे. ठाकरे सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत शुक्रवारी भाजपने 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन सुरुवात केली आहे. 'माझ अंगण माझे रणांगण' अंतर्गत राज्य सरकार विरुद्ध भाजपने पुकारलेल्या आंदोलनात अनेक बड्या नेत्यांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र बचावसाठी सकाळी 11 ते 12 या वेळात कार्यकर्ते आपल्या घरासमोर काळे मास्क वा बीजेपीचे झेंडे व हातामध्ये बॅनर घेऊन सरकारचा निषेध केला. राज्याच्या विविध ठिकाणी या आंदोलनाला सुरुवात झाली असून अनेक बडे नेते हे आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर सत्ताधारी काँग्रेसनं याला 'भाजप बचाओ' आंदोलन असं म्हटलं आहे.  या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीनं 'महाराष्ट्रद्रोही भाजप' असं आंदोलन सुरू केलं आहे. महाराष्ट्रद्रोही BJP हा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला आहे. अन्य बातम्या 'कोव्हिड-19 टेस्टिंगच्या नावाखाली बिझनेस, रुग्णाकडून घेतले जात आहेत 3 हजार' काँग्रेस प्रवक्ता संजय झा कोरोना पॉझिटिव्ह; काळजी घेण्याचं केलं आवाहन
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: BJP

    पुढील बातम्या