लातूर, 11 फेब्रुवारी : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औसा तालुक्यातील बुधोडा गावात आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी दुष्काळावर चर्चा केली. तसंच आदित्य ठाकरे यांनी एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन जनावरांना चारा टाकल्याचंही पाहायला मिळालं. दरम्यान, मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळाची स्थिती आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या चाऱ्यासाठी लोकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.