मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या विनोद पाटलांना आदित्य ठाकरेंची स्पेशल ऑफर!

मराठा आरक्षणासाठी झटणाऱ्या विनोद पाटलांना आदित्य ठाकरेंची स्पेशल ऑफर!

आदित्य ठाकरे यांनी विनोद पाटील यांना सेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. आता विनोद पाटील यावर काय निर्णय घेतात त्यावर मराठवाड्याच राजकारण अवलंबून असेल अशी चर्चा आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

औरंगाबाद, 30 ऑगस्ट : मराठा आरक्षणसंबंधी याचिका दाखल करणाऱ्या विनोद पाटील यांनी खुद्द आदित्य ठाकरे यांच्याकडून स्पेशल ऑफर देण्यात आली आहे. जन आशिर्वाद यात्रे निमित्ताने आदित्य ठाकरे हे औरंगाबादमध्ये होते. यावेळी ते खास विनोद पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. यावेळी शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर आदित्य ठाकरे यांनी विनोद पाटील यांना दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर पाटील यांनी आदित्य यांच्या समोर मुद्दे मांडले. यावर आदित्य ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवायच्या असतील तर तुम्ही शिवसेनेत यायला हवं अशी भावना व्यक्त. आदित्य ठाकरे यांनी विनोद पाटील यांना सेनेत येण्याची खुली ऑफर दिली आहे. आता विनोद पाटील यावर काय निर्णय घेतात त्यावर मराठवाड्याच राजकारण अवलंबून असेल अशी चर्चा आहे. या आधीही विनोद पाटील यांनी सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चा झाल्या होत्या.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विनोद पाटील यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मराठा समाजामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण झालं आहे. मराठा क्रांती मोर्चा आणि त्यानंतर मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई यामुळे विनोद पाटील हे नाव चर्चेत आलं. सरकारने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर विनोद पाटील यांनी न्यायालयात हे आरक्षण टिकावं यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर विनोद पाटील हेदेखील राजकारणाचा मैदानात दिसू शकतात अशा चर्चांना उधाण आलं होतं.

औरंगाबादमध्ये काही दिवसांनी विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये शिवसेनेचं वर्चस्व असल्याने ही जागा शिवसेना जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून काही नावं चर्चेत आहेत. यामध्ये राज्यमंत्री आणि मराठवाड्यातील शिवसेनेचे वजनदार नेते अशी ओळख असलेले अर्जुन खोतकर, शहरप्रमुख राजू वैद्य, जिल्हाध्यक्ष नरेंद्र वैद्य यांच्यासह विनोद पाटील यांचंही नाव चर्चेत आहेत. याबाबत 'सरकारनामा'ने वृत्तही दिलं होतं.

इतर बातम्या - पीडितेच्या मृत्यूनंतरही 4 नराधम मोकाट, कुटुंबीयांनी शवविच्छेदनासाठी दिला नकार!

मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निकालानंतर विनोद पाटलांनी घेतली होती उद्धव ठाकरेंची भेट

कोर्टामध्ये मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निकाल आल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यातील विविध पक्षातील नेत्यांची भेट घेत आभार मानले होते. यावेळी विनोद पाटलांनी मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विनोद पाटलांसह सर्वांचं अभिनंदन केलं होतं.

इतर बातम्या - मुंबईची हायटेक सुरक्षा आता ड्रोनच्या हाती, हवेतच होईल शत्रूचा खात्मा!

दरम्यान, मराठा आऱक्षणाबाबत काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी मराठा समाजाला सुप्रीम कोर्टात दिलासा मिळाला. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाने तुर्तास नकार दिला आहे. दोन आठवड्यादरम्यान याचिकाकर्ते पुन्हा याचिका करु शकतात, असंही कोर्टाने म्हटलं होतं.

SPECIAL REPORT : नातेवाईकांनीही साथ सोडल्याने शरद पवार दुखावलेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 08:20 PM IST

ताज्या बातम्या