राज्य सरकारच्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर आदित्य ठाकरेंना शंका

राज्य सरकारच्या कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर आदित्य ठाकरेंना शंका

'कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तर तो कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाही त्यामुळं आता तर फक्त निसर्गाच्या पावसाची वाट पाहिली पाहिजे.'

  • Share this:

बालाजी निर्फळ उस्मानाबाद 9 जून : पावसाला विलंब होत असल्याने राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करणार असल्याचं जाहीर केलं. मात्र युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मात्र या प्रयोगावर शंका व्यक्त केलीय. कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तर तो कितपत यशस्वी होईल हे सांगता येत नाही त्यामुळं आता तर फक्त निसर्गाच्या पावसाची वाट पाहणं महत्वाचं असल्याचं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलंय. आदित्य हे मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर आले आहेत. एका गावाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

उस्मानाबाद व मराठवाड्यात दुष्काळ तीव्र आहे. याचं दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना पुढे आलीय. आज पासून राज्यभरात पुढीचे 10 दिवस बाळासाहेब ठाकरे महाप्रसादच्या माध्यमातून चारा छावण्यातील शेतकऱ्यांना अन्याधान्याची सोय केलीं जाणार आहे. या उपक्रमाची सुरवात आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूम तालुक्यातील चारा छावणीत करण्यात आली. आदित्य ठाकरेंनी चारा छावणीतल्या महिला शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

राज्य सरकारने घेतला कृत्रिम पावसाचा निर्णय

राज्यात उद्‌भवलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी उपाय योजना करण्याचा निर्णय राज्य सरकारने 28 मे रोजी घेतला होता. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय. त्यासाठी एरियल क्लाऊड सीडींग (Arial Cloud Seeding) उपाययोजना करून कृत्रिमरित्या पाऊस पाडण्यात येणार आहे.

राज्यात कमी पाऊस पडल्याने यंदा दुष्काळी पर‍स्थ‍िती असून बहुतांशी भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळी पावसात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या पातळीवर विविध उपायांचा अवलंब करण्याबाबत विचारविनिमय सुरु आहे. कृत्रिम पर्जन्यमान हा त्यातलाच एक भाग आहे. सुयोग्य ढगांची उपलब्धता बघून राबविण्यात येणाऱ्या या उपाययोजनेबाबत अगोदरच निर्णय घेऊन पूर्वनियोजन करणे आवश्यक असल्याने आज मंत्रिमंडळाने एरियल क्लाऊड सीडिंग करून पर्जन्यवाढ करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 30 कोटी रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे.

परदेशात एरियल क्लाऊड सीडींगच्या प्रयोगातून 28 ते 43 टक्क्यांपर्यंत पर्जन्यमान वाढल्याचे आढळून आले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त भागात क्लाऊड सीडींगच्यामाध्यमातून पाऊस पाडला जाणार आहे. त्यासाठी औरंगाबाद येथे सी बॅन्ड डॉपलर रडार आणि विमान सज्ज ठेवण्यात येणार आहे.

First published: June 9, 2019, 5:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading