मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राजकारणात नवा ट्विस्ट! आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

राजकारणात नवा ट्विस्ट! आदित्यनं आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

  • Published by:  Sandip Parolekar

औरंगाबाद, 30 डिसेंबर: वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरण कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) पुण्यात अटकेत आहे. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत कन्नडच्या (Kannad) राजकाराणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election ) रणधुमाळी सुरू आहे. य पार्श्वभूमीवर हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अकरावीत शिकत असलेले त्यांचा सुपुत्र आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. धक्कादायक म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे.

हेही वाचा...सुनेत्रा पवार यांचं गायन आणि अजितदादांकडून खळखळून हसत दाद, VIDEO VIRAL

दैनिक 'दिव्य मराठी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आदित्य जाधव यांनी वडिलांच्या अर्थात हर्षवर्धन जाधव यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नडमध्ये पत्रकार परिषद बोलावली. तालुक्यातील शेतकरी त्रस्त असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे यावेळी आदित्यनं पत्रकारांना सांगितले. एवढंच नाही तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं पत्रकारांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांची अगदी कसलेल्या नेत्याप्रमाणे उत्तरंही दिली.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आता माजी आमदार रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाल्यानंतर आदित्यनं स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. यानिमित्तानं स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्यानं राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे सांगत तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी आदित्यनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव यांच्या औंध मारहाण प्रकरणी रोज नवनवे खुलासे आणि आरोप होताना दिसत आहेत. हर्षवर्धन जाधव यांचे सासरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच हा हल्ला घडवून आणला आणि जाधव खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असा सणसणाटी आरोप त्यांच्या वकीलांनी केला आहे. तसंच या प्रकरणातील सहआरोपी आणि हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रीण इशा झा देखील पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या आहेत.

हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी दानवेंवर आरोप केला असला तरी हल्ला करणारा नगरसेवक हा काँग्रेसचा आहे. या प्रकरणानंतर हर्षवर्धन जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शाब्दिक हल्ले चढवले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात पुण्यात खूनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. शहरातील चतुश्नूंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. याबाबत अमन अजय चड्डा यांनी फिर्याद दिली होती. किरकोळ अपघाताच्या वादातून जाधव यांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप अमन अजय चड्डा यांनी केला आहे.

हेही वाचा...मुंबईत भीषण अपघात, डंपर चालकाने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडले

याप्रकरणी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 15 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादातून दुचाकीस्वाराला जाधव यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून ते भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावईदेखील आहेत.

अटक टाळण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून छातीत दुखत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र पोलिसांनी ससून रुग्णालयात तपासणी करून त्यांना रिसतर अटक केली.

First published: