मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आदर पुनावाला यांना मोदी सरकारनेच धमकी दिली, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा गंभीर आरोप

आदर पुनावाला यांना मोदी सरकारनेच धमकी दिली, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा गंभीर आरोप

'एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे'

'एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे'

'एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे'

  • Published by:  sachin Salve
अहमदनगर, 06 जून: कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे (serum institute) आदर पुनावाला  (Adar Poonawalla) यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले. सिरम संस्थेला केंद्र सरकारनेच धमकी दिली होती. त्यामुळे जून महिन्यात 10 कोटी डोस मिळू शकलेले नाहीत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना हसन मुश्रीफ यांनी कोरोना आणि लसीकरणाच्या मुद्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सिरम संस्थेनं राज्य सरकारला जून महिन्यात 10 कोटी लस देणार होती. त्यांनी तसं मान्यही केलं होतं. पण केंद्र सरकारने धमकी दिल्यामुळे त्या लशी राज्याला मिळाल्या नाही. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे, असा आरोप मुश्रीफ यांनी केला, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे. वाह! चांगली बातमी...ठाण्यातल्या 'या' गावात अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही तसंच,  देशात लसीकरणावरून मोदी सरकारने गोंधळ घातला आहे. लसीकरणासाठी एक धोरण असणे गरजेचं आहे. 45 वर्षांपुढील नागरिकांना केंद्राकडून लस दिली जात आहे, तर त्याखाली18 ते 44 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकार लस देत आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकारकडून लस देण्यात येत आहे लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या लशीवर मोदींचा फोटो आहे, असं असेल तर आम्ही सुद्धा राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांचा फोटो लावू, असंही मुश्रीफ म्हणाले. लसीकरणाच्या या गोंधळावर लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, या भेटीत लसीकरणाच्या मुद्यावर चर्चा करतील, अशी माहितीही मुश्रीफ यांनी दिली. आदर पुनावाला यांचे देशासाठी मोठे योगदान, सुरक्षा पुरवा -हायकोर्ट दरम्यान, आदर पुनावाला यांना मिळालेल्या कथित धमक्यांबाबत अॅड. दत्ता माने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. 'सिरम इंस्टिट्युटच्या आदर पुनावाला यांनी देशासाठी सध्याचा काळात खूप मोठ योगदान दिले आहे. त्यामुळे अश्या व्यक्तीला जर धमक्या येत असतील तर ते फार गंभीर प्रकरण आहे, याची तातडीनं दखल घ्यायला हवी', असे परखड मत हायकोर्टाने नोंदवले. ...म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही, गावसकरांनी सांगितलं कारण जर या याचिकेतील दाव्यांत तथ्य असेल तर पुनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ सुरक्षा पुरवायला हवी, असे आदेशही हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. पुढील सुनावणीत राज्य सरकारनं यावर सविस्तर अहवाल सादर करावा, असं हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
First published:

पुढील बातम्या