CAA आणि NRC विरोधातील उर्मिलाच्या कार्यक्रमात घुसण्याचा हिंदुत्ववाद्यांचा गोंधळ, पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

CAA आणि NRC विरोधातील उर्मिलाच्या कार्यक्रमात घुसण्याचा हिंदुत्ववाद्यांचा गोंधळ, पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात

उर्मिला मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांची प्रमुख उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमाआधी काही हिंदुत्ववादी व्यक्तींनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली.

  • Share this:

पुणे, 30 जानेवारी : सीएए आणि एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या पुण्यातील कार्यक्रमात गोंधळ झाला आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांची प्रमुख उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमाआधी काही हिंदुत्ववादी व्यक्तींनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

पुण्यातील कोथरुड येथील गांधीभवन इथं हा कार्यक्रम होत आहे. सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधी अहिंसात्मक जनआंदोलन असा या कार्यक्रमाचा विषय आहे. मात्र उर्मिला मातोंडकर या कार्यक्रमाला पोहचण्याआधी तिथं काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

CAA आणि NRC विरोधात देशभर आंदोलने

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून देशभरात आंदोलन सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व संशोधन कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. केंद्राने देशभरात CAA लागू केल्यापासून आंदोलने सुरू आहेत. हा कायदा मागे घेण्यात यावा यासाठी CAA विरोधात अनेकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आता तर हा मुद्दा परदेशातही चर्चिला जात असून युरोपातील संसदेत या कायद्यावर चर्चा केली जाणार आहे.

मोदींची विरोधकांना ऑफर

सीएए आणि एनआरसीवर देशात सत्ताधारी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं वातावरण चांगलंच तापलं आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांसोबत सर्व मुद्दयांवर चर्चा करण्याची तयारी दाखवल्यानं वातावरण निवळण्याची शक्यता निर्माण झालीय. अर्थसंकल्पाच्या आधी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मोदींनी अर्थव्यवस्थेसहीत सर्व मुद्द्यांवर चर्चा करायला तयार असल्याचं सांगितल्याचं संसंदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी सांगितलं आहे.

First published: January 30, 2020, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading