नेत्यांचे फक्त आश्वासन... अखेर या मराठमोळ्या अभिनेत्रीने निवडला हा मार्ग

नेत्यांचे फक्त आश्वासन... अखेर या मराठमोळ्या अभिनेत्रीने निवडला हा मार्ग

दीपाली सय्यद यांनी आजपासून (9 ऑगस्ट) जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

  • Share this:

अहमदनगर, 9 ऑगस्ट- लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात श्रीगोंदा तालुक्यातील साकळाई योजना मंजूर केली जाईल, असा दावा भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांनी केला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुका येतील तरी हे आश्वासन पूर्ण झाले नाही. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. असा निर्धार करत मराठी अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दीपाली सय्यद यांनी आजपासून (9 ऑगस्ट) जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. शेकडो गावकऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

साकळाई पाणी योजनेसाठी दीपाली सय्यद यांचा लढा सुरु आहे. दीपाली सय्यद यांनी गेले दीड महिना गावोगावी फिरून गावकऱ्यांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. त्यातून आपल्या मागणीसाठी त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी त्याठिकाणी सभा घेऊन हा प्रश्न सोडवता येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीही सभा घेऊन साकळाईचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अनेक दिवस होऊनही योजनेचे काम सुरू झालेले नाही. ही योजना सुरू करावी, या मागणीसाठी दीपाली सय्यद मागील आठ महिन्यांपासून पाठपुरावा करत आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासन देऊनही योजनेचे काम सुरू झालं नाही. ही योजना 3 टीएमसीची आहे मात्र, ती शक्य नसेल तर 2 टीएमसी का होईना ही योजना पूर्ण करावी, ही मागणी दीपाली सय्यद यांनी केली आहे.

VIDEO : सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्या महाजनांवर धनंजय मुंडेंचा घणाघात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 9, 2019 10:03 PM IST

ताज्या बातम्या