अपघातानंतर अभिनेत्री शबाना आझमी यांच्या चालकाविरोधात FIR दाखल

अपघातानंतर अभिनेत्री शबाना आझमी यांच्या चालकाविरोधात FIR दाखल

शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी : अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi Accident) यांच्या गाडीला शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. अपघातानंतर जखमी झालेल्या शबाना आझमी यांना सुरुवातीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं. आता शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

पुण्याचे दिशेने जाताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शबाना आझमी यांच्या सफारी गाडीने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी आता ट्रक चालकाने आझमी यांच्या गाडीच्या ड्रायव्हरविरोधात तक्रार दाखल केली आहे. कारण अपघातात आजमी यांच्या गाडीसह ट्रकचंही नुकसान झालं आहे.

शबाना आझमी यांच्या अपघातानंतर त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्वीट केलं आहे. 'शबाना आझमी यांच्या अपघाताचं वृत्त वेदनादायी आहे. त्या लवकर बऱ्या होण्यासाठी मी प्रार्थना करतो,' असं ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दरम्यान, पुण्याच्या दिशेला जाताना खालापूर येथे शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. खालापूर टोल नाक्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला शबाना आझमी यांच्या टाटा सफारी गाडीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शबाना आझमी यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालकही जखमी झाला आहे.

शबाना आझमी यांची प्रकृती ठीक होण्यासाठी देशभरातील मान्यवरांनी प्रार्थना केली आहे. 'शबाना आझमी यांचा अपघात झाल्याचं कळाल्यानंतर वाईट वाटलं. त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना करते,' असं ट्वीट गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं आहे.

कोण आहेत शबाना आझमी?

-शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला

-अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण

-आझमी यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले

-जुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात काम

- जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ड चित्रपटातही काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2020 09:06 AM IST

ताज्या बातम्या