मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विरोधी आमदारांच्या निलंबनाने सत्ताधाऱ्यांची खुर्ची मजबूत, वर्षभरासाठी ‘अशी’ बदलली सत्तेची समीकरणं

विरोधी आमदारांच्या निलंबनाने सत्ताधाऱ्यांची खुर्ची मजबूत, वर्षभरासाठी ‘अशी’ बदलली सत्तेची समीकरणं

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 आमदारांचं निलंबन होणं, ही बाब महाविकास आघाडीच्या स्थिरतेसाठी अत्यंत पोषक असल्याचं निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवलं जात आहे.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 आमदारांचं निलंबन होणं, ही बाब महाविकास आघाडीच्या स्थिरतेसाठी अत्यंत पोषक असल्याचं निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवलं जात आहे.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 आमदारांचं निलंबन होणं, ही बाब महाविकास आघाडीच्या स्थिरतेसाठी अत्यंत पोषक असल्याचं निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवलं जात आहे.

मुंबई, 5 जुलै : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या (State Assembly Session) पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या 12 आमदारांचं निलंबन (Suspention of 12 MLA) होणं, ही बाब महाविकास आघाडीच्या (MVA) स्थिरतेसाठी  (Stability) अत्यंत पोषक असल्याचं निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवलं जात आहे. त्याचप्रमाणं मुंबई महापालिका निवडणुका (BMC Elections) तोंडावर आल्या असताना आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर आणि अतुल भातखळकर या मुंबईतील भाजपच्या शिलेदारांचं निलंबन झाल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रशासकीय आणि संवैधानिक कामकाजात भाग घेता येणार नाही.

अशी बदलली सत्तेची समीकरणं

भाजपकडे राज्यात 106 आमदारांचं संख्याबळ आहे. महाराष्ट्रात बहुमतासाठी आवश्यक असणारा जादुई आकडा आहे 145. म्हणजेच भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ 39 आमदारांची गरज होती. भाजपव्यतिरिक्त इतर 10 आमदार सध्या भाजपला पाठिंबा द्यायला तयार असल्याचं चित्र आहे. त्यामुळं उरलेले आमदार फोडून भाजप सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरू होती. मात्र आता 12 आमदारांचं निलंबन झाल्यामुळे हे स्वप्न अपुरं राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

टांगत्या तलवारीपासून दिलासा

भाजप विधिमंडळात कुठल्याही क्षणी खेळी करेल आणि आमदार फोडून सत्तास्थापनेचा दावा करेल, अशी भीती सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांना वाटत होती. त्यातच गेल्या महिन्यात झालेली उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलेली स्वबळाची भाषा आणि राष्ट्रवादीविरोधात सुरु झालेल्या चौकशा यांच्यामुळे सरकार अधिकच अस्थिर झाल्याचं चित्र होतं. मात्र 12 आमदारांच्या निलंबनामुळे किमान वर्षभर तरी महाविकास आघाडी सरकारचा धोका टळला असल्याचं बोललं जात आहे.

भाजपसमोरचे पर्याय

आता एखाद्या पक्षानं पाठिंबा देणे, हाच एकमेव पर्याय भाजपसमोर आहे. केवळ आमदार फोडून सत्ता स्थापन करण्याचं आणि सरकार उलथवण्याची शक्यता या निलंबनामुळे अधिकच धूसर झाली आहे. या घटनेनंतर त्याचे जोरदार राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता असून पुढील काही दिवस महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे वाचा - 'भाजपच्या आमदारांनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, अंगावर धावून आले'

दिल्लीतही पडसादांची अपेक्षा

महाराष्ट्रातील या घटनेचे दिल्लीत जोरदार पडसाद उमटण्याची शक्यता असून त्याचा परिणाम येत्या काळात बघायला मिळू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. केंद्र सरकार याच आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची बातमी आहे. शिवाय मोदी-उद्धव ठाकरे यांच्यात पुन्हा संवाद सुरू होत असल्याचंही चित्र आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: BJP, Maharashtra politics