हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, भाजप नेत्यासह 10 जणांना अटक; 'लेडी सिंघम'ची कारवाई

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड, भाजप नेत्यासह 10 जणांना अटक; 'लेडी सिंघम'ची कारवाई

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी भाजप नेता आणि नगरपालिकेच्या उपाध्यक्षासह 10 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

  • Share this:

अमरावती, 12 जून: हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी भाजप नेता आणि नगरपालिकेच्या उपाध्यक्षासह 10 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून 1 लाख 81 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिला पोलिस अधिकारीने ही धडक कारवाई केली आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथे झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा... जालना हादरलं! जन्मदात्या आईचा खून करून मामाला केला फोन, दारुड्या मुलाचं कृत्य

कारवाई न करण्यासाठी होता राजकीय दबाव..

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरातील श्रीकृष्ण पेठ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरी पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेल्या कारवाईत 10 व्यक्तींना जुगार खेळताना पकडले. यात मोर्शी नगरपालिकाचे उपाध्यक्ष व भाजप नेत्याचा समावेश आहे. त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व वाहने असा 1 लाख 81 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

मोर्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई न करण्यासाठी कविता फडतरे यांच्यावर राजकीय दबाव होता. मात्र, त्यांनी या दबावाला न जुनानता ही धडक कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजू मडावी, भारत धाकडे, संदीप वानखडे, आशिष काळे तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी 10 जूनला दुपारी 5 च्यादरम्यान श्रीकृष्ण पेठ येथे एका घरात धाड टाकून जुगार खेळणाऱ्या 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा... दारूचा ग्लास नीट भर म्हणून त्याने आणला हातोडा, दारुड्या मित्रांनी जे केलं ते...

मोर्शी नगरपालिकाचे उपाध्यक्ष जितेंद्र गेडाम यांच्यासह नगरसेविकेचा पती, नगरसेवक आईचा मुलगा व एक मोर्शी नगरपालिकेचा कर्मचाऱ्यासह 10 जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या हायप्रोफाईल जुगारवर कारवाई केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

First published: June 12, 2020, 2:53 PM IST

ताज्या बातम्या